नांदेड - राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज नांदेड शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात...
नांदेड - राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज नांदेड शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील तरोडा बुद्रुक भागातील कॅनाल रोडवर असलेल्या संत गाडगे बाबा चौकात अभिवादन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमास अखिल भारतीय परिट/धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. बालाजी शिंदे, जेष्ठ पत्रकार श्री आनंद कल्याणकर, माजी नगरसेवक विनायक सगर, सचिन देशमुख तरोडेकर, सुरज सोनेकर, बळवंत तेलंग, हणुमंत तेलंग, नवनाथ भंडारे, प्रा. एस. एस. जाधव, बालाजी ईबितवार, राहुल चिंतलवाड आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील महात्मा फुले चौक आणि तरोडा खुर्द येथील संत गाडगेबाबा चौकात रक्तदान शिबिर व अन्नदान कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी गाडगेबाबा यांच्या समाज प्रबोधनात्मक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान आणि समाजसेवा यासाठी आयुष्य वेचणारे गाडगेबाबा हे खऱ्या अर्थाने लोकसंत होते.त्यांच्या आदर्शांचे आजच्या काळात अनुकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

COMMENTS