बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने एकाच घराच्या नोंदी महादेव मंदिर ट्रस्टच्या नावे लावल्याचे निदर्शनास आल्याने ही माझी स्वतःची जागा परस्पर प्रशासकीय यंत्रणेचा वापर करत हा प्रकार घडला जात असल्याचे समजल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करूनही मला न्याय मिळत नसल्याने सुनील सुरेशराव कुलकर्णी हे बेमुदत उपोषणाला साठी बसले होते.
उपोषणास ५ दिवस पूर्ण होऊनही प्रशासनाने विशेष दखल घेतली नाही . ही बाब अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी,तहसीलदार ,पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. लातूरकरांनी परिपूर्ण प्रयत्न करून आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देत आंदोलनकर्ते सुनिल कुलकर्णी यांची समजूत काढली . तहसीलदारांकडून परिपूर्ण मदतीचंचे आश्वासन मिळाल्याने
कुलकर्णी यांनी उपोषण मागे घेतले.,यावेळी मंडळाधिकारी, गजानन जोशी,मा.सरपंच नाईनवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS