किनवट : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड संचलित कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र (उपकेंद्र), किनवट येथे माजी ...
किनवट : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड संचलित कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र (उपकेंद्र), किनवट येथे माजी खासदार स्व. उत्तमरावजी राठोड यांची ९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत किनवटच्या सर्वांगीण विकासातील त्यांचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत जाधव यांनी स्व. राठोड यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, किनवटच्या आजच्या विकासामागे त्यांचा दूरदृष्टीपूर्ण विचार होता. त्यांनी घातलेल्या पायाभरणीमुळे दुर्गम भागाला विकासाची नवी दिशा मिळाली, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
AI तंत्रज्ञानाचा अनोखा प्रयोग
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर. डॉ. योगेश आंबुलगेकर यांनी या तंत्रज्ञानाद्वारे स्व. उत्तमराव राठोड यांचा आवाज पुनरुज्जीवित करत केंद्राच्या भविष्यातील वाटचालीबाबत त्यांच्या भावनांचे सादरीकरण केले. यामुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.
मुख्य मार्गदर्शक डॉ. समाधान दराडे यांनी उत्तमरावजींच्या जीवनप्रवासाचा संक्षिप्त आढावा घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यक्षीय समारोप करताना केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड यांनी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत असल्याचे सांगितले व तीच खरी त्यांना आदरांजली असल्याचे नमूद केले.
यावेळी हायकोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत राठोड, सामाजिक कार्यकर्ते विनायक गव्हाणे, डॉ. सुनील व्यवहारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. योगेश आंबुलगेकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. श्रेयस पवार यांनी केले, तर आभार चेतन जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहप्राध्यापक डॉ. प्रमोद राठोड, प्रा. श्रीकांत दुधारे, रमेश जाकुलवार यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS