टेनिस व्हॉलीबॉल राष्ट्रीय निवड चाचणी कोपरखैरणे, नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य संघाची घोषणा जल्लोषात*



नवी मुंबई. २७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा भाटपारा छत्तीसगड येथे दि. २६ जून ते 30 जून या कालावधीत होणार असून सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ सहभागी होणार आहे.

त्याकरिता महाराष्ट्र संघाची निवड चाचणी टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने आणि नवी मुंबई टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या विद्यमाने क्राईस्ट अकॅडमी स्कूल अँड ज्यू कॉलेज, कोपरखैरणे येथे आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणी करिता महाराष्ट्रातील नवी मुंबई, ठाणे, मुंबई, परभणी, हिंगोली, मुंबई उपनगर, पुणे, नाशिक, अमरावती अशा विविध जिल्ह्यातही खेळाडूंनी ज्युनिअर आणि सब ज्युनिअर गटात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

या निवड चाचणी साठी टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक  व्यंकटेश वांगवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि क्राईस्ट अकॅडमी स्कूल चे संचालक फादर जेसन यांनी मुलां सोबत संवाद साधला. तसेच महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉल चे राज्य सचिव गणेश माळवे, राज्य उपाध्यक्ष कोरडे, राज्य कोषाध्यक्ष डॉ.दिनेश शिगारम, बालभारती शिक्षक तज्ञ श्रीमती प्रगती भावसार मॅडम, नवी मुंबई सचिव वैभव शिंदे, अशोक शिंदे,आशिष ओबेरॉय, सचिन भोसले यांची उपस्थिती होती.

ज्युनिअर मुले: कृष्णा अहिरे 

 विवेक साळुंखे ,प्रसाद महाले  मयूर बोरसे ,प्रताप पौळ ,अनंत धापसे

सब-ज्युनिअर मुले: ईश्वर मोरे 

दिव्यांशु चांद ,वेदांत महामाने 

गौरव चौधरी ,मयूर निकम 

विर पाटील.

 ज्युनिअर मुली : वेदिका बेंद्रे 

मृणाली सरवदे , श्रेया सिंग  सृष्टी शिंदे ,मान्यता जैन 

अंकिता सरगर.

सब- ज्युनिअर मिश्र दुहेरी :राजवीर भोसले  सोनाक्षी कदम,

ज्युनिअर मिश्र दुहेरी :शिवम कदम ,श्रेया धावन

प्रशिक्षक :उज्वला कदम

शिवदास खुपसे,गणेश आम्ले 

संघ व्यवस्थापक :निलेश माळवे.

टिप्पण्या