*गंगाखेड (प्रतिनिधी)* शहरातील सामाजिक समूह सवंगडी कट्टा यांच्यातर्फे मागील आठ दिवसापासून आयोजित वारकरी सेवा शिबिराचा समारोप दिनांक 24 जून रोजी संत जनाबाई मंदिर येथे झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे तर प्रमुख पाहुणे संत जनाबाई संस्थांनचे सचिव डॉ. दिनकर मुंडे, सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा दर्डा, प्रसिद्ध चिकित्सक डॉ.संजय भरड, संघचालक अतुल तुपकर ,दानशूर व्यक्तिमत्व गोपाळ कात्रे व प्रभाकर आप्पा दावलबाजे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी या वारकरी शिबिरासाठी ज्यांनी ज्यांनी आर्थिक स्वरूपात, औषधी स्वरूपात, सेवेच्या स्वरूपात, प्रसिद्धी च्या स्वरूपात,इतर दृश्य ,अदृश्य स्वरूपात सेवा देणाऱ्या अशा सर्व दानदाते, सेवेकरी या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज नाव्हेकर तर आभार प्रदर्शन गजानन महाजन यांनी केले याप्रसंगी. सवंगडी कट्टा समूहाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
सवंगडी कट्टा वारकरी सेवा शिबिराचा समारोप
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा