दक्षिण आफ्रिकेतील धावस्पर्धा यशस्वी करणारे कृष्णा गोसावी यांचा सानपाडा वासियांच्या वतीने सत्कार



नवी मुंबई : सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यातील कोळेवाडी गावचे सुपुत्र  आणि नवी मुंबईत सानपाडा येथे राहणारे कृष्णा यशवंत गोसावी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डोंगराळ भागातील चढउतारांनी भरलेल्या खडतर मार्गावरून पार पडणारी जगातील सर्वात जुनी आणि सर्वात कठीण मानली जाणारी ९०  किलोमीटर कॉम्रेडस मॅरेथॉन ही धाव स्पर्धा  त्यांनी १० तास ३२  मिनिटात यशस्वीरित्या पहिला प्रयत्नात पूर्ण केली. त्याबद्दल कृष्णा गोसावी यांचा  २५  जून  २०२५ रोजी सानपाडा येथील सिताराम मास्तर उद्यानात ७.५० गार्डन ग्रुपमध्ये सानपाडा रहिवाशांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सानपाड्यामधील समाजसेवक सोमनाथ वास्कर , अजय पवार,  विजय विरकर, आबा जगताप, अजित सावंत, देवेंद्र चोरघे, मारुती विश्वासराव,  राजू सैद, अरुण रोडे, रामचंद्र पाटील,  शिवाजी ढमाले, रणवीर पाटील,  सदाशिव तावडे, अशोक संकपाळ,  परशुराम शिरोळ, विकास  वाघुले, गणपत वाफारे,  गणेश हुले, राजदत्त लंगडे तसेच ७.५० गार्डन ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी एकूण २२६८५  खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ऑल ओव्हरमध्ये  ८७२२ क्रमांक आणि कॅटेगरीनुसार ३४६८  क्रमांक आला असून,  कृष्णा गोसावी हे पुरुष गटात ७५६६  क्रमांकांनी यशस्वी झाले.

कृष्णा यशवंत गोसावी हे सिद्धिविनायक ग्रुप ऑफ कंपनीचे मालक असून त्यांनी जिद्द, चिकाटी आणि सरावाच्या जोरावर आपल्या भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवले आहे. त्यांनी आपल्या भारताचा तिरंगा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर  फडकविला असून, त्यांच्या या कामगिरीने सातारा जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. 

दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय धाव स्पर्धेत सहभाग मिळणे तसे कठीण होते.  यामध्ये फक्त धावण्याचे कौशल्य नव्हे तर मानसिक ताकद. शारीरिक सहनशक्ती आणि अपार जिद्द यांची कसोटी लागते. कृष्णा गोसावी हे व्यवसायात यशस्वी असतानाही समाजसेवा, तरुणांना दिशा देणे आणि गावाची नाळ जोडून ठेवणे, यासाठी नेहमीच तत्पर असतात. खेड्यापाड्यातील युवकांनाही मेहनतीच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते. हे त्यांनी  आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या अद्वितीय यशाबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ, कोळेवाडी तसेच सानपाड्यामधील सर्व सामाजिक संस्थां व  राजकीय पक्षांच्या वतीने कृष्णा गोसावी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. 

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या