पहिल्या विश्वचषक खो-खोच्या प्रचार-प्रसारासाठी तोरसकर, संगवे व कदम यांची निवड

  नवी दिल्ली, दि.११ जानेवारी - नवी दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेसाठी खो-खोचा ग्रामीण ते जागत...



 

नवी दिल्ली, दि.११ जानेवारी - नवी दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेसाठी खो-खोचा ग्रामीण ते जागतिक स्तरापर्यंत डिजिटल, सोशल मीडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रचार-प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या तिघांची निवड झाली आहे. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सहसचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर (मुंबई), प्रसिद्धी समितीचे चेअरमन अजितकुमार  संगवे (सोलापूर) व सदस्य भूषण  कदम (पुणे) यांचा यात समावेश आहे.

त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

अल्प परिचय

बाळासाहेब शिवाजी तोरसकर (सहसचिव ) : खेळ आणि समाजकार्य यांचा सुरेख संगम साधत खो-खोच्या क्षेत्रात आपले स्थान अधोरेखित केले. राष्ट्रीय खो-खो पंच.  महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या प्रसिद्धी समितीचे चेअरमन म्हणून कार्य.  मुंबई खो-खो संघटना उपाध्यक्ष.  मुंबई व महाराष्ट्रात खो-खोच्या प्रसिद्धीसाठी  महत्वाची भूमिका. वेगवेगळ्या वर्तमानपत्रात खेळासाठी विविध लेख प्रसिद्धी.  मुंबईत झालेल्या एकमेव राष्ट्रीय खो---

अजितकुमार बापूराव संगवे (प्रसिद्धी समिती चेअरमन) : पत्रकार. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खो-खोपटू. राष्ट्रीय खो-खो पंच. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या किशोरी खो-खो संघाचे प्रशिक्षक. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन प्रसिद्धी समितीचे सदस्य व सचिव म्हणून कार्य. सोलापूर खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर --

भूषण प्रकाश कदम (प्रसिद्धी समिती सदस्य ) : प्रवर्तक म्हणून निवड. फोटोग्राफर. १२ वर्षे खेळ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनकरिता खेळाचा प्रचार प्रसार प्रवर्तक म्हणून काम. माजी प्रसिद्धी समिती सचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन. पुणे जिल्हा खो-खो असोसिएशन व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन कुमार/कुमारी गटाकरिता निवड समिती सदस्य म्हणून काम. मुक-बधिर विद्यार्थ्यांना खो-खो प्रशिक्षण देऊन खेळाची आवड निर्माण करण्याचे कार्य केले.  गरजू ग्रामीण भागातील 

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group