मुंबई - भारतीय रेल्वेत, मध्य रेल्वेतील कामगारांच्या प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवते ती एकमात्र संघटीत व ऐतिहासिक संघटना म्हणजे 'नॅशनल रेल्वे मजदूर युनियन". ही संघटना आंतरराष्ट्रीय फेडरेशनशी (ITF) संलग्र असल्यामुळे आयटीएफ तर्फे नेशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस काँग्रेड वेणू पी नायर ह्यांनी सध्या कामगार मानसिक तणावात काम करत असतात तो तणाव कशा पद्धतीने कमी करता येईल म्हणून त्यांच्या साठी 'मानसिक आरोग्य व कल्याण' कार्यक्रम करावा असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. ह्या प्रस्तावाला कॉम्रेड वेणू पी नायर ह्यांनी मान्यता देऊन वेळात वेळ काढून नुकताच मध्य रेल्वेत, दादर येथील इन्स्टिट्यूट येथे भव्य दिव्य कार्यक्रम पार पाडला.
ह्या कार्यक्रमाला (ITF) चे प्रमुख पाहुणे कॉस्टीव ट्रौसडेल, ग्लोबल ईन्स्पेक्टोरेट को-ऑरडीनेटर आणि डॉक्टर आसिफ अल्ताफ, ग्लोबल मेंटल वेलबेइंग प्रोग्रामचे को-ऑरडीनेटर यांचा सभागृहात प्रवेश होताच सर्वांनी टाळ्या व "दुनियाके मजदूर एक हो" या घोषणा देऊन स्वागत केले, त्याच प्रमाणे एनआरएमयू च्या अध्यक्षा कॉ. कामाक्षी बागलवाडीकर ह्यांच्या हस्ते कॉ. स्टीव ट्रौसडेल यांना शाल, पुणेरी कयाप , बुके आणि तलवार देऊन स्वागत केले तसेच कॉ. पी जे शिंदे, यांनी डॉक्टर आसिफ अल्ताफ, यांना शाल, पुणेरी कयाप व बुके देऊन स्वागत केले. सरचिटणीस कॉ. वेणू पी नायर ह्यांच्या कार्याची व युनियनच्या कार्यपद्धती कशाप्रकारे चालते ह्याची माहितीपट फिल्मच्या माध्यमातून दाखवण्यात आले.
कॉ. स्टीव ट्रौसडेल आपल्या भाषणात म्हणाले कि संपूर्ण लालम-लाल युनिफार्म घालून आलेले कार्यकर्ते आणि टाळ्यांच्या गर्जात झालेल्या स्वागताने तसेच युनियनचे कार्य पाहून एकदम भारावून, आनंदित व आश्चर्यचकित झाले, त्यांनी कॉ. वेणू पी नायर यांचे आभार मानले. डॉक्टर आसिफ अल्ताफ, यांस सर्व हॉल पूर्णपणे भरलेला व शिस्त पाहून कॉ. वेणू पी नायर यांची जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच आहे अशा शब्दांत प्रशांसा केली व अशा प्रकारे पुन्हा कार्यक्रम मुंबईत कॉ. वेणू पी नायर ह्यांनी करावा अशी विनंतीही त्यांनी केली.
कॉ. वेणू पी नायर यांनी आलेल्या पाहुण्यांचे अभिनंदन व स्वागत केले तसेच कॉ. आसिफ अल्ताप यांनी केलेल्या प्रस्तावाचा विचार करू. कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले कि कार्यकर्त्यांनी कामगारांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करा, त्यांच्या सुखदुखात सहभागी व्हा आणि एकत्र येऊन युनियनचे काम करा, विषेश म्हणजे युवा व महिला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत त्यांनी पुढे येऊन कार्य करणे आवश्यक आहे. अध्यक्षा कॉ. कामाक्षी बागलवाडीकर यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले

addComments
टिप्पणी पोस्ट करा