नांदेड (दि.११ जानेवारी २०२५)
तंत्रज्ञानाच्या वाढत्या काळामध्ये ध्यानाला अनन्यसाधारण महत्व आले आहे, असे विधान यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना, यशवंत महाविद्यालयाच्या विशेष वार्षिक शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
विशेष वार्षिक शिबिराच्या उदबोधन शिबिराचे अध्यक्ष राज्यशास्त्र विभागातील डॉ.वीरभद्र स्वामी होते.
पुढे मार्गदर्शनपर भाषणात, ध्यानधारणा व योगसाधनेची प्रात्यक्षिक करत डॉ.अजय गव्हाणे यांनी धावपळीच्या आधुनिक युगामध्ये योग साधनेचे किती महत्त्व आहे, व ते मानवी शरीरासाठी कसे फायदेशीर आहे, यावर सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ.वीरभद्र स्वामी यांनी, ध्यान योग विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मदत करते, यावर मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास करते, असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कोलते यांनी केले, प्रास्ताविक डॉ. कैलास इंगोले यांनी केले तर आभार निखिल सोनकांबळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा. अभिनंदन इंगोले, डॉ.श्रीराम हुलसुरे, गणेश विनकरे, संविधान कांबळे, श्रीकांत गायकवाड तसेच स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.
माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष शिबिरातील बौद्धिक सत्र आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. विशेष शिबिराच्या सर्व उपक्रमातील यशस्वीतेसाठी प्रा.राजश्री भोपाळे, डॉ.कांचन गायकवाड, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदी सहकार्य करीत आहेत.

addComments
टिप्पणी पोस्ट करा