जूनियर कॉलेजच्या संच मान्यतेचा कॅम्प यश स्वी

 


सहाय्यक उपसंचालक श्री.मठपती साहेब व त्यांच्या सर्व टीम मधील सहकार्याने पाठीमागील एका दिवसांमध्ये जो नांदेड शहरांमध्ये जूनियर कॉलेजच्या संच मान्यतेचा कॅम्प राजश्री शाहू जुनियर कॉलेज नांदेड याठिकाणी संपन्न झालेला होता त्याप्रसंगी नांदेड जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यता जवळपास करून घेण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर या ठिकाणच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेतर्फे जाहीर आभार सायंकाळी सात वाजता प्राध्यापक महेश आनंदराव देशमुख यांनी जाहीर आभार मानले,याही समोर आम्हास आपले सहकार्य लाभत राहील अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. आभार कर्ते. जिल्हा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा.संभाजीराव वडजे सर, जिल्हा संघटनेचे सचिव प्रा.नारायण गाढवे सर, जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक.प्रा.मुकुंदराव बोकारे सर, मुख्याध्यापक संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव मोती भाऊ व जिल्हा उपाध्यक्ष.प्रा.महेश देशमुख सर, प्रा.शितळे सर, फाजगे सर, प्रा.पंडित सर, प्रा.डॉ.विनायक देव सर, प्रा.प्रमोद सावंत सर, प्रा.किशनराव गायकवाड सर, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती. कॅम्प यशस्वी पद्धतीने चालविल्याबद्दल नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयाचे जाहीर आभार,तसेच उपसंचालक कार्यालय लातूर येथील सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार.

टिप्पण्या