प्रा मुकुंद बोकारे सरांना कुणबी भूषण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

 

कंधार येथील मनोविकास माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक मुकुंद बोकारे सर यांना महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ कुणबी भूषण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सध्या वास्तव्याला सिडको येथे आसून नांदेड दक्षिण मध्ये त्यांच्या सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे

 गेली 40 वर्षापासून प्राध्यापक मुकुंद बोकारे सर हे सर्वसामान्य लोकांसाठी मौल्यवान वेळ दोघेही दांपत्य देत आहेत शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रात त्यांचं वेगळेपणाचा ठसा त्यांनी उमठवलेला आहे सामाजिक जीवनामध्ये कुणाच्याही संकटात धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्राध्यापक मुकुंद बोकारे व माजी नगरसेविका व सेवानिवृत्त प्राध्यापिका ललिता बोकारे ताई यांचे कार्य सातत्याने चालू आहे या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना कुणबी मराठा महासंघ कुणबी भूषण राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण उपसंचालक  डॉ गणपत मोरे साहेब माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर व कोल्हापुर च अध्यक्ष सुधाकर तेलंग साहेब  माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेड  माजी संचालक अरुण ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दिलीपराव धर्माधिकारी साहेब जिल्हा जुटा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक संभाजी पाटील वडजी जिल्हा जुटा संघटनेचे प्राध्यापक महेश देशमुख जिल्हा उपाध्यक्ष झुकता संघटना नांदेड मोती मोती भाऊ केंद्रे सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना प्राध्यापक विनायक देव प्राध्यापक नारायणराव गाढवे आधी जणांनी त्यांचे अभिनंदन केले आहे यांच्यावतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आलेलं आहे या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे माननीय प्राध्यापक मुकुंद बोकारे सरांना पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

टिप्पण्या