सायन्स कॉलेज मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न*
शहरातील प्रतिष्ठित नांदेड एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सायन्स कॉलेज चा 78 वा स्वातंत्र्य दिन महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ वेंकटेश जी काब्दे यांच्या उपस्थितीत प्रभारी प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांच्या हस्ते सकाळी 7:40 वाजता ध्वजारोहण संपन्न झाला. कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ व्यंकटेश जी काब्दे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एल पी शिंदे, उप प्राचार्य प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा ई एम खिल्लारे, पर्यवेक्षक प्रा एम आर मुळे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनी, मुलांच्या वस्तीगृहातील विद्यार्थी, एनसीसी चे सर्व कॅडेट्स, एन एस एस चे सर्व स्वयंसेवक व इतर महाविद्यालयातील विद्यार्थी ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित राहून राष्ट्रगीत मध्ये सहभागी झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननिय डॉ. वेंकटेश काब्दे उपस्थित्यांना संबोधित करताना महापुरुषाच्या अथक परिश्रमाने व त्यागाने आजचा हा सोनेरी दिवस आपल्या वाट्याला आलेला आहे त्याचे जतन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकशाही टिकली तरच आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकू अन्यथा आपल्या शेजारील देशाची जी अवस्था झाली ती होण्यास फारसा वेळ लागणार नाही. असे मार्मिक विचार व्यक्त केले तद्वतच आपल्या संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आलेख प्रस्तुत करून आपल्या विद्यार्थांना एनसीसी, क्रीडा, एन एस एस, अशा अनेक क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिकांच्या उंच शिखरावर मार्गक्रमण करीत आहेत याची प्रचिती पालक वर्गाला करून दिली. कार्यक्रमाचे सुंदर संचलन व आभार प्रदर्शन स्टॉप सेक्रेटरी व उपप्राचार्य प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी केले. कार्यक्रमात समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, बहुसंख्य पालक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित राहून मोठ्या हर्ष उल्लासात हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. एन एस एस च्या युनिट मधून राज्यस्तरीय विद्यापीठ स्तरीय जिल्हास्तरीय व विभागीय व महाविद्यालयीन मॅरेथॉन रॅलीमध्ये तिरंगा रॅलीमध्ये तसेच वेगवेगळ्या शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
addComments
टिप्पणी पोस्ट करा