तरुणांनी दहीहंडी खेळताना आठ थराच्या वरती थरावर थर रचा, परंतु अपघात होणार नाही, याची दहीहंडी मंडळांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सुरक्षितपणे खेळ खेळावा आणि सणांचा आनंद घ्यावा. दहीहंडी खेळाला सहाशी खेळ म्हणून राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. सर्वांनी " थर " हा सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट १६ ऑगस्ट पासून महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे, तरी आपण सर्वांनी हा चित्रपट पाहावा. या चित्रपटाला मी शुभेच्छा देत आहे. असे स्पष्ट उद्गार नवी मुंबईचे लोकनेते व माजी मंत्री मा. श्री. गणेश नाईक यांनी १५ ऑगस्ट २०२४ रोजी कोपरखैरणे येथील बालाजी थिएटरमध्ये गोविंदाची दहीहंडी यावर आधारित " थर " या मराठी चित्रपटाच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
याप्रसंगी आमदार गणेश नाईक पुढे म्हणाले की. आपल्या देशात अनेक जाती-धर्माची लोक एकत्र राहतात. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिलांना सर्वांना नियम केले आहेत. जगामध्ये आपल्या देशात सर्वात मोठी लोकशाही असून लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून देखील भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
याप्रसंगी नवी मुंबईचे माजी महापौर मा. श्री. संदीप नाईक, दिग्दर्शक अमित मोहिते, निर्माते विलास चव्हाण, अभिनेत्री पूनम विनेकर, भक्ती प्रधान, कबीर, परेश मोरे, शिवाजी पाटणे, रंगराव घागरे आणि पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव आदी मान्यवर उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा