मोदी यांच्या नेतृत्वाखाली खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या 36 कोटी रुपयांच्या निधीतील विकास कामांचे भूमिपूजन आज खा. चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

  

खा.चिखलीकर यांच्या 36 कोटीच्या निधीतील विविध विकास कामांचे आज भूमिपूजन

नांदेड : नांदेड शहर व परिसराचा विकासातून कायापालट करण्याचे अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्रपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील सर्वच भागात शाश्वत विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याच अनुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील आणि परिसरातील विविध विकास कामांसाठी तब्बल 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा निधी मंजूर करून घेतला असून या निधीतील विविध विकास कामांचे आज भूमिपूजन करण्यात येणार आहे.या निधीतून नांदेड महानगरपालिकेच्या विविध प्रभागातील रस्ते विकास करण्यात येणार असून मंदिर,  विहाराच्या कायापालटासाठी ही  निधी मंजूर करण्यात आला आहे. शाश्वत विकासाच्या अनुषंगाने खा. चिखलीकर यांच्या निधीतून विकास कामे करण्यात येणार आहेत.

उद्या दिनांक 11 मार्च रोजी सकाळी दहा वाजता ओंकारेश्वर मंदिर तारोडा बुद्रुक येथे , दुपारी बारा वाजता रेणुका माता मंदिर एम जी रोड , तर दुपारी दोन वाजता सिडको बस स्टॉप येथे या कार्यक्रमाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे . हा भूमिपूजन सोहळा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पार पडणार असून यावेळी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर,  खा. अशोक चव्हाण,  आ.  राम पाटील रातोळीकर , आ. राजेश पवार,  आ. तुषार राठोड , भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे , एडवोकेट किशोर देशमुख , महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते , माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले,  एडवोकेट चैतन्य बापू देशमुख, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे -  चिखलीकर , भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, देविदास राठोड, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, संजय घोगरे , बाबुराव कदम, दिलीपराव धर्माधिकारी, उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर , दिगंबर पवार, जीवनराव घोगरे , मिलिंद देशमुख, अजयसिंह भीषण,  बाळू खोमणे,  राजू गोरे ,  दिलीप ठाकूर,  नंदकुमार कुलकर्णी, अरविंद भारतीय,  सौ श्रद्धाताई चव्हाण , दीपकसिंह रावत , वैशालीताई देशमुख, सौ शांताबाई गोरे, गुपीलेताई, विजय गंभीरे , अनिल पाटील बोरगावकर , यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे .

आयोजित भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज