रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!* *जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक

  कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत '३७ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची 'पधारो म्हारे देस' अव्व...

 


कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत '३७ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची 'पधारो म्हारे देस' अव्वल!*गुरुकुल द डे स्कूलच्या ऋग्वेद आमडेकर आणि डीएव्ही पब्लिक स्कुलच्या(नवीन पनवेल) दिक्षा शिलवंत यांना अभिनयाचे प्रथम पारितोषिक!

मुंबई: जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत 'रविकिरण मंडळाची ३७ व्या बालनाट्य स्पर्धा नुकतीच मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संगीत, प्रकाश योजना तसेच अभिनय (मुलींमध्ये) तृतीय व अभिनय (मुलांमध्ये) उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावून हे बालनाट्य अव्वल ठरले. यासोबत द्वितीय क्रमांक सेक्रेड हार्ट, हायस्कुलच्या 'को म की का' या बालनाट्यास तर तृतीय पुरस्कार आर्टिस्ट प्लॅनेट, काळाचौकी शाळेच्या 'जा रे जा, सारे जा' पटकाविले. तसेच पहिले उत्तेजनार्थचे बक्षीस विलेपार्ले महिला संघ - मराठी माध्यम शाळेच्या 'छोटा अंबानी' या बालनाट्याला तर दुसरे उत्तेजनार्थ गुरुकुल द डे स्कूलच्या 'अ-फेअर'ला देण्यात आले. या चुरशीच्या स्पर्धेत १७ बालनाट्यांचा समावेश होता, त्यातून हा अंतिम निकाल देण्यात आला आहे.

लालबाग, परळ या कामगार विभागातील डिलाईल रोड 'रविकिरण मंडळ हे 'दक्षिण मुंबईचं सांस्कृतिक केंद्र' म्हणून ओळखले जाते. ते खेळाडू आणि कलावंतांचे आशेचे किरण असून गेली सहा दशके हे मंडळ अविरत कार्यरत आहे. लहान मुलांची शालेय जीवनापासून नाट्यकलेची आवड जोपासली जावी व त्यासोबतच त्यांची प्रशंसा व्हावी या उद्देशाने गेली ३६ वर्षे ही संस्था बालनाट्य स्पर्धांचे आयोजन करीत आहे. नुकतीच मुंबईच्या यशवंत नाट्य मंदिर येथे दिवंगत जेष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांना समर्पित करण्यात आलेली ३७ वी बालनाट्य स्पर्धा मुलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. विजेत्यांना पुरस्कार देण्यासाठी खास 'आई कुठे काय करते?' या मालिकेतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी, अभिनेता अभिषेक देशमुख, या मालिकेची लेखिका व कमलाकर नाडकर्णी यांची कन्या नमिता नाडकर्णी - वर्तक, केईएमच्या डॉ. नीना सावंत(मानोसोपचार तज्ञ), यांसह परीक्षक अभिनेत्री दीप्ती भागवत, जुई लागू - खोपकर व अरुण मडकईकर उपस्थित होते.

पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुलांशी दिलखुलास संवाद साधला. मुलांना यशाचा मंत्र सांगताना ते म्हणाले, "रूप, रंग यापेक्षा अभिनय महत्वाचा आहे. तो जमला तरच तुम्ही नायक - नायिका होऊ शकता, मलाही लहानपणी अभिनयात न्यूनगंड होता, मात्र जेष्ठ दिवंगत अभिनेते अरुण सरनाईक यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच मी आज यशस्वी अभिनेता झालो आहे. रविकिरण सारख्या संस्थेचा मला लाभ घेता आला नाही, पण आज तुमच्या सोबत ही संधी आहे, तुम्ही तिचा पुरेपूर लाभ घ्यावा."या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश नामदेव वांद्रे मंडळाचे चिटणीस यांनी केले. ते म्हणाले जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांना ही स्पर्धा समर्पित करण्यात आली असून नाडकर्णींचे रविकिरण मंडळासोबतचे दृढ आणि अत्यंत जिव्हाळ्याचे नातेसंबंध होते. बालरंगभूमीशी नाडकर्णींनीची नाळ जोडलेली होती, ते स्वतः बालकलाकार, लेखक, नाटककार असल्याने त्यांना बालकलाकारांच्या भावविश्वाची अचूक जाण होती, बालरंगभूमीबद्दल त्यांना कायम ममत्व होते

मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय टाकळे त्यांच्या भाषणात म्हणाले, "रविकिरणचं हे ३७ वे वर्षे आहे. नाट्यकला सेवेतून संस्थेने अनेक प्रतिभावंत कलावंतांच्या जडणघडणीत विशेष भुमिका पार पाडली आहे. ३७ वर्षांच्या या संपूर्ण प्रवासात सुखद आठवणींसह दुःखद प्रसंग देखील आले, मात्र तरीही न डगमगता हा प्रवास असाच सुरू आहे व राहील.

या बालनाट्य स्पर्धेला एलआयसी, ओएनजीसी, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी आर्थिक भार उचलून सहाय्य केले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अशोक परब यांनी सांभाळली व पारितोषिक वितरण समारंभाला लागणाऱ्या क्रिएटिव्ह कामाची जबाबदारी विनीत देसाई, मंदार साटम, व रोशन वांद्रे यांनी सांभाळली.*३७ वी रविकिरण बालनाट्य स्पर्धा – २०२३*

 *स्मृतिगत कमलाकर नाडकर्णी स्मृती निकाल* 

*सर्वोत्कृष्ट बालनाट्य २०२३* :

*प्रथम* 

*बालनाट्याचे नाव*: पधारो म्हारे देस 

*शाळा/ संस्थेचे नाव*: पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालय-विलेपार्ले 

*व्दितीय*

*बालनाट्याचे नाव*: को म की का 

*शाळा/ संस्थेचे नाव*: सेक्रेड हार्ट, हायस्कुल

 तृतीय*

बालनाट्याचे नाव: जा रे जा, सारे जा 

शाळा/ संस्थेचे नाव: आर्टिस्ट प्लानेट काळाचौकी 

*उत्तेजनार्थ १* :

बालनाट्याचे नाव: छोटा अंबानी

शाळा/ संस्थेचे नाव: विलेपार्ले महिला संघ- मराठी माध्यम

*उत्तेजनार्थ २

*बालनाट्याचे नाव*: अ-फेअर  

*शाळा/ संस्थेचे नाव*: गुरुकुल द डे स्कूल   

दिग्दर्शन विभाग*

*दिग्दर्शन प्रथम* 

दिग्दर्शकाचे नाव: सुमित तांबे 

*बालनाट्याचे नाव*: पधारो म्हारे देस 

*शाळा/ संस्थेचे नाव*: पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालय-विलेपार्ले 

*दिग्दर्शन व्दितीय*

दिग्दर्शकाचे नाव: चैतन्य परदेसी, गौरांग यादव

बालनाट्याचे नाव: छोटा अंबानी

शाळा/ संस्थेचे नाव: विलेपार्ले महिला संघ- मराठी माध्यम

*दिग्दर्शन तृतीय*

दिग्दर्शकाचे नाव: करिष्मा विलास वाघ

बालनाट्याचे नाव: जा रे जा, सारे जा 

शाळा/ संस्थेचे नाव: आर्टिस्ट प्लानेट काळाचौकी 

*अभिनय (मुले)*

*अभिनय (मुले) प्रथम* 

मुलाचे नाव /भूमिकेचं नाव: ऋग्वेद आमडेकर 

व्यक्तिरेखेचे नाव : कबीर 

*बालनाट्याचे नाव*: अ-फेअर  

  • *शाळा/ संस्थेचे नाव*: गुरुकुल द डे स्कूल   
  • *अभिनय (मुले) व्दितीय*
  • मुलाचे नाव : निषाद दांडेकर 
  • व्यक्तिरेखेचे नाव : तो 
  • *बालनाट्याचे नाव*: भेट  
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: सनिकला मंच, किल्ले धारूर    
  • *अभिनय (मुले) तृतीय*
  • मुलाचे नाव : क्षितीज दुबळे  
  • व्यक्तिरेखेचे नाव : श्याम ( लांडगा ) 
  • *बालनाट्याचे नाव*: आईचा श्याम   
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: श्री आवाज संस्कृती फाउंडेशन     
  • *अभिनय (मुले) उत्तेजनार्थ १*
  • मुलाचे नाव : साहिल गावडे  
  • व्यक्तिरेखेचे नाव : रामसिंह चौहान  
  • *बालनाट्याचे नाव*: पधारो म्हारे देस 
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालय-विलेपार्ले 
  • *अभिनय (मुले) उत्तेजनार्थ २*
  • मुलाचे नाव : साईराज घोडेचोर 
  • व्यक्तिरेखेचे नाव : वशा  
  • *बालनाट्याचे नाव*: काय ते जाणावे
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: डीएव्ही पब्लिक स्कुल (नवीन पनवेल)
  • *अभिनय (मुली)*
  • *अभिनय (मुली) प्रथम* 
  • मुलीचे नाव : दिक्षा शिलवंत 
  • व्यक्तिरेखेचे नाव : ताई  
  • *बालनाट्याचे नाव*: काय ते जाणावे
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: डीएव्ही पब्लिक स्कुल (नवीन पनवेल)
  • *अभिनय (मुली) व्दितीय* 
  • मुलीचे नाव : मुग्धा शेलार 
  • व्यक्तिरेखेचे नाव : ती 
  • *बालनाट्याचे नाव*: भेट  
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: सनिकला मंच, किल्ले धारूर    
  • *अभिनय (मुली) तृतीय* 
  • मुलीचे नाव : शमिका नाईक 
  • व्यक्तिरेखेचे नाव : नैना शेखावत 

  • *बालनाट्याचे नाव*: पधारो म्हारे देस   
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालय-विलेपार्ले 
  • *अभिनय (मुली) उत्तेजनार्थ १*
  • मुलीचे नाव : दिया गीते 
  • व्यक्तिरेखेचे नाव : नैना
  • *बालनाट्याचे नाव*: अ-फेअर  
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: गुरुकुल द डे स्कूल   
  • *अभिनय (मुली) उत्तेजनार्थ २* 
  • मुलीचे नाव : परनिका गडकरी  
  • व्यक्तिरेखेचे नाव : राग 
  • बालनाट्याचे नाव: जा रे जा, सारे जा 
  • शाळा/ संस्थेचे नाव: आर्टिस्ट प्लानेट काळाचौकी 
  • तांत्रिक विभाग 
  • *उत्कृष्ट संगीत (लाईव्ह)* : 
  • *विजेत्याचे नाव*: प्रफुल्ल मस्के
  • बालनाट्याचे नाव*: पधारो म्हारे देस 
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालय-विलेपार्ले
  • *उत्कृष्ट ध्वनी संकलन*
  • *विजेत्याचे नाव*: मंदार गानू, सुशील वाघमारे  
  • *बालनाट्याचे नाव*: काय ते जाणावे
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: डीएव्ही पब्लिक स्कुल (नवीन पनवेल)
  • *उत्कृष्ट प्रकाश योजना*
  • *विजेत्याचे नाव*: वैभव पिसाट  
  • बालनाट्याचे नाव*: पधारो म्हारे देस 
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालय-विलेपार्ले
  • *उत्कृष्ट नेपथ्य*
  • *विजेत्याचे नाव*: संदेश पडवळ, प्रितीश खंडागळे, गायत्री खांडगे  
  • *बालनाट्याचे नाव*: को म की का 
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: सेक्रेड हार्ट, हायस्कुल  
  • *लेखन विभाग*
  • *लेखन प्रथम*
  • लेखकाचे नाव: सुरेश शेलार
  • *बालनाट्याचे नाव*: को म की का 
  • *शाळा/ संस्थेचे नाव*: सेक्रेड हार्ट, हायस्कुल  
  • *लेखन व्दितीय*
  • *लेखकाचे नाव* : विनोद गायकर  
  • *बालनाट्याचे नाव* : अ-फेअर  
  • *शाळा/ संस्थेचे नाव* : गुरुकुल द डे स्कूल 
  • *लेखन तृतीय*
  • लेखकाचे नाव: रोहित कोतेकर
  • बालनाट्याचे नाव: छोटा अंबानी
  • शाळा/ संस्थेचे नाव: विलेपार्ले महिला संघ- मराठी माध्यम
  • *प्रसिद्धी जनसंपर्क* : राम कोंडीलकर,
  • *संपर्क क्रं : मो. व्हॉट्सApp* : ९८२१४९८६५८
  • *इमेल* : ramkondilkar.pr@gmail.com

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group