कृषी विकास अधिकारी व्ही. आर. बेतीवार आकाशवाणीवर

नांदेड,22- कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी व्ही. आर. बेतीवार यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत आज शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या किसानवाणी कार्यक्रमातून रात्री साडेसात वाजता प्रसारित होणार आहे.

     राष्ट्रीय किसान दिनानिमित्त ही मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीमधून त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच माळेगाव यात्रेत कृषी विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा व कृषी प्रदर्शन आदी विषयावर बातचीत केली आहे. तरी श्रोत्यांनी ही मुलाखत ऐकावी, असे आवाहन नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी तथा कार्यालय प्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे.


टिप्पण्या