शैक्षणिक साहित्यांनी महामानवाला अभिवादन करावे एक वही एक पेन अभियानचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र

मुंबई -26- सर्वाधिक शिक्षण घेवून समाजालाही शिक्षणाचा मूलमंत्र देणारे प्रकांड पंडित घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक साहित्याने अभिवादन करावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेवून निवेदन करण्यात आले आहे.

समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून महामानवाला वह्या पेन पुस्तकांची मानवंदना हा उपक्रम मागील नऊ वर्षांपासून एक वही एक पेन अभियानाच्या माध्यमातून राबविला जातो..महापरिनिर्वाण दिन, महापुरुषांचे जयंती उत्सव तसेच गणेशोत्सवात देखील जनतेने शैक्षणिक जागर करून गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवावा असे आवाहन केले जाते त्यानुसार महाराष्ट्रात ठिकठिकाणी या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला जातो अशी माहिती या अभियानचे प्रणेते जेष्ठ पत्रकार राजू झनके यांनी दिली आहे.

     अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक माध्यमिक व उच्च शिक्षण घेतले.परदेशात जावून देखील त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून अनेक पदव्या संपादन केल्या.देशाला सर्वोच्च संविधान दिले.वंचित घटकांना आरक्षणाचा अधिकार दिला.त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेवून कोलंबिया विद्यापीठाने जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून त्यांचा पुतळा विद्यापीठाच्या आवारात उभारला .अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यावर मात करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत शिक्षणाची कास सोडली नाही ते आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगले समाजालाही त्यांनी शिक्षण घेण्याचा मूलमंत्र दिला त्यामुळे त्यांना हार फुले वाहून अभिवादन करण्यापेक्षा वह्या पेन पुस्तके आदी शैक्षणिक साहित्याने अभिवादन करणे हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली राहणार असून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांनी ही सूचना स्वीकारून समाजाला शिक्षणाप्रती सकारात्मक संदेश द्यावा असे आवाहन झनके यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री व उद्योग मंत्री यांची भेट घेवून केली आहे.

शैक्षणिक साहित्यांनी महामानवाला अभिवादन करावे

एक वही एक पेन अभियानचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र 

टिप्पण्या