सन्माननीय श्री अरुण ठाकरे साहेब , पूर्व शिक्षण सहसंचालक , महाराष्ट्र शासन ... आज आपला जन्मोत्सव ... जीवनाच्या उत्तर आयुष्यातही प्रयोजन प्रदीप्त आणि प्रफुल्लित ठेवले की चैतन्य जीवनाला ऊर्जा पुरवत राहते.. अजून ही आदरणीय ठाकरे साहेब सतत उत्साही आणि उत्सवी मूड मध्ये जीवनाचा आनंद घेत असतात.. विविध कार्यात आणि कार्यक्रमात ते रसरसून भाग घेतात ... कृषी, उद्योग आणि घर गृहस्थी मध्ये व्यस्त असतात... आजही स्वतःच्या विचारधारेशी तटस्थ आणि प्रामाणिक असलेले ठाकरे साहेब लातूर नांदेड मधील स्नेहांकीताच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात.. आम्ही शिक्षणाधिकारी असताना साहेब आमचे विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर होते... अधिनस्त सर्व अधिकाऱ्यांना सांभाळून घेऊन प्रशासन करणारे ठाकरे साहेब प्रकृती ठणठणीत सांभाळून आहेत...सदैव सकारात्मक विचारधारेची पाठराखण करणाऱ्या आणि मराठवाड्यावर विशेष लोभ असलेल्या ठाकरे साहेबांना शंभर वर्षाचे निकोप आणि आनंदी आयुष्य मिळावे ,हीच शुभकामना ...!
सेवानिवृत्त प्राध्यापक
मुकुंद बोकारे नांदेड
addComments
टिप्पणी पोस्ट करा