नवीन नांदेड,26- श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईकमहाविद्यालय वसरणी नांदेड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. एस.व्ही. शेट्टे हे होते तर विचार मंचावर उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. जगदीश देशमुख, प्रा.डॉ. अनिल गच्चे, प्रा. डॉ. नागेश कांबळे, प्रा. डॉ. विजय मोरे, प्रा. डॉ. गणेश लिंगमपल्ले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन पी. दिंडे, कार्यालयीन अधीक्षक आर.डी. राठोड यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर प्रा. डॉ. जगदीश देशमुख यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिकरीत्या वाचन केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शनपर बोलताना प्रा.डॉ. एस. व्ही. शेट्टे म्हणाले की, भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय ही लोकशाहीची मूल्ये आपल्याला भारतीय संविधानातून मिळाले आहेत. सर्व धर्म समभाव, विविधतेतील एकता व अखंड भारताला एकसंघ ठेवण्याचे काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. म्हणून अशा सर्वश्रेष्ठ संविधानाचे रक्षण व जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. असे मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार म्हणाले की, भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार व कर्तव्य याचे पालन प्रत्येक भारतीय नागरिकांनी केले पाहिजे. प्रत्येक भारतीय नागरिकांनी संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधान काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. जेणेकरून संविधानाच्या माध्यमातून आपले मूलभूत हक्क, अधिकार व कर्तव्य काय आहेत याची जाणीव आपल्याला होते. म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकांनी येत्या काळात भारतीय संविधानाचे वाचन करने नितांत गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी यावेळी अध्यक्षीय समारोपात केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. नागेश कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. गणेश लिंगमपल्ले यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील जेष्ठ प्रा. डॉ. एन. के. झरे, डॉ. आर. एम. कांगणे, डॉ. यु. एस. कानवटे, प्रा. कोतवाल, प्रा. झांबरे, प्रा.मुस्तापुरे, प्रा. शेख, डॉ.एल.व्ही. खरात, डॉ. धारबा रणवीर, डॉ. राहुल सरोदे, डॉ शोभा वाळूककर, प्रा. अनिल दिवटेवाड, प्रा. कांबळे, प्रा.शशिकांत हटकर, काशिनाथ राठोड, रमेश कांनगुलवार, बालाजी कोडतीवार, मारुती कांबळे, पसारकर, शेख, कंठाळे, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा