स्वारातीम’ विद्यापीठामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.२८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  

यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह रामदास खोकले, बबन हिंगे व विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. 

टिप्पण्या