हिंगोलीत 'लिगो'सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प खेचून आणला- खासदार श्रीकांत शिंदे दूरदृष्टीचा नेता संबोधित खासदार हेमंत पाटलांवर उधळली स्तुतीसुनने

 

नांदेड, दि.२७ (प्रतिनिधी): जगभरात लिगो सारखे केवळ दोनच महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. खासदार हेमंत पाटील यांनी औढा नागनाथ परिसरात २६०० कोटी रुपयाचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिगो प्रकल्प खेचून आणला आहे. हेमंत पाटील हे महाराष्ट्रातील खासदारांमध्ये सर्वात जास्त निधी खेचून आणणारे दूरदृष्टी नेता आहेत, असे वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.

शनिवारी (दि.२७) कयाधू नदीवरील १ हजार कोटी ९१३ लाख रुपयांच्या मोठा पूल जोडरस्ता बांधकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, खासदार हेमंत पाटील यांनी हळद संशोधन केंद्रासह नासासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प खेचून आणला. तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचे हित जोपासण्याचं काम त्यांनी केले असा गौरवपूर्ण उल्लेख खासदार शिंदे यांनी केला.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हदगाव तालुक्यातील तळणी, साप्ती, कोहळी, सिरड, पेवा करोडी, उंचेगाव, भानेगाव येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या हदगाव तालुक्यातील वाहतुकीची सुविधा भक्कम व्हावी आणि तेथील विकासाला चालना मिळावी यासाठी मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्य महामार्ग क्रमांक 416 चा प्रश्न सोडवण्यात आला.

याप्रसंगी बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, अजय देशमुख, सरपंच सीमा सुदर्शन आढाव, परमेश्वर शिंदे, प्रल्हाद इंगोले, सह संपर्कप्रमुख चितांगराव कदम, यवतमाळचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख विशाल गनात्रा, अप्पर जिल्हाधिकारी श्री बोरगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांची उपस्थिती होती. यावेळी गावकऱ्यांच्या मदतीने खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार हेमंत पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे,  युवा सेना जिल्हा प्रमुख संदेश पाटिल हडसणीकर, युवा सेना तालुकाप्रमुख बाळा पाटिल पतंगे, भाजपा ता. प्र आशिष सकवान, युवासेना जि. प्र यवतमाळ महेश पवार यांच्यासह इनेकांची उपस्थिती होती.
टिप्पण्या