नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्याकडील अधिकारी व अंमलदारांचे एक पोल...
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्याकडील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक लातूर जिल्हयात रवाना केले होते.
सदर पथकाने, दिनांक 28.08.2026 रोजी भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मौजे गुळखेडा येथे बालाजी सुरवसे याचे पत्र्याचे शेडमध्ये व खंडू भोसले याचे हॉटेलमध्ये जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत, 34,320/-रुपयांची रोकड, (15) मोबाईल व (2) मोटार सायकली असा एकूण 3,60,320/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात एकूण (17) इसमांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द भादा पोलीस ठाणे येथे गुरनं 180/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये गुन्हा नोंदवून, त्याचा तपास भादा पोलीस ठाण्यातील पोहेकॉ शिरीष पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, पथकाने औसा शहरातील कालन गल्लीतील, अबुझर अतिक शेख याचे इमारतीत मटका बुकीवर कारवाई करत, 22,880/-रुपयांची रोकड व 69,400/- हजार रुपयांचे (10) मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण (14) आरोपीतांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द औसा पोलीस ठाणे येथे गुरनं 498/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा नोंदवून, त्याचा तपास औसा पोलीस ठाण्यातील पोहेकॉ बालाजी चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
उपरोक्त दोन्ही कारवायांत, पथकाने एकूण (31) आरोपींकडून 57,200/- रुपयांची रोकड, (25) मोबाईल व (2) मोटार सायकली असा एकूण 4,52,600/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ/ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ/ गणेश राठोड, पोहेकॉ/ संदिप वाघाडे व पोहेकॉ/ गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.
' खबर ' हेल्पलाइन वरुन माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

.jpeg)
COMMENTS