आपले काम शेवटपर्यंत नेण्यासाठी तुमचा भाऊ बांधील आहे -प्रा. मनोहर धोंडे*

शिवा संघटनेच्या कार्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न* *समग्र शिक्षा अभियान व डाटा एंट्री ऑपरेटर पोषण आहार च्या बहिणीनी बांधल्या प्रा.मनो...


शिवा संघटनेच्या कार्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न*
*समग्र शिक्षा अभियान व डाटा एंट्री ऑपरेटर पोषण आहार च्या बहिणीनी बांधल्या प्रा.मनोहर धोंडे यांना राख्या
लोहा/ प्रतिनिधी
समग्र शिक्षा अभियानातील कर्मचारी हे दि.२ जुलै २०२६ रोजी सेवेत कायम झाले व त्यांचा जीआर २४ आॅगस्ट रोजी निघाला तेव्हा आपले काम शेवटपर्यंत नेण्यासाठी तुमचा भाऊ बांधील आहे असे प्रतिपादन शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी लोहा येथे समग्र शिक्षा अभियान व डाटा एन्ट्री आॅपरेटर शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने आयोजित रक्षा बंधन कार्यक्रमात केले.
लोहा येथील शिवा संघटनेच्या मुख्य कार्यालयात दि. २९ आॅगस्ट २०२६ रोजी समग्र शिक्षा अभियान व डाटा एन्ट्री आॅपरेटर पोषण आहार संघटनेच्या वतीने रक्षा बंधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे होते तर प्रमुख उपस्थिती समग्र शिक्षा अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय अकोले, डाटा एन्ट्री आॅपरेटर शालेय पोषण आहार संघटनेचे राज्य सचिव सिध्दार्थ सोनकांबळे, शिवा कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानोबा घोडके ,+++++ +++ मनिषाताई ++++ +++++ यांच्यासह महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांना समग्र शिक्षा अभियान व डाटा एन्ट्री आॅपरेटर शालेय पोषण आहार संघटनेच्या सर्व महिला कर्मचारी यांनी राख्या बांधल्या.
यावेळी पुढे बोलताना प्रा. मनोहर धोंडे म्हणाले की, रक्षा बंधनांचा कार्यक्रम हा अत्यंत स्नेहाचा व प्रेमाचा योगायोग आहे.
आपल्या सर्व भगिनींनी मला भाऊ मानुन राखी बांधली मी स्वतःला भाग्यवान समजतो एवढ्या बहिणी मला मिळाल्या. राखीचा धागा हा विश्वासाचा धागा आहे. आपण सर्व भगिनींनी राखी बांधली व माझ्यावर बंधु प्रेमाचे ओझे आहे. नात रक्ताचच नाही तर मानुसकी व विचारांचे असावे . मी ४० वर्षांपासून चळवळीतील कार्यकर्ता आहे . माझे नातेवाईक माहित नाहीत पण विचारांचे नाते मी जपतो. मी कधी कुणाचे काम करताना त्यांची जात पाहिली नाही.
शिवा संघटना जातीची संघटना आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन सर्वाचे कामे करतो शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत कधी कुणाची जात पाहिली नाही.
मी १९९६ ला शिवा संघटनेची स्थापना केली तेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचा मराठवाडा प्रमुख होतो. त्यावेळी उध्दव ठाकरे,राज ठाकरे शिवसेनेत आले नव्हते.
जेव्हा सहा विभाग होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमची एका टेबलवर बैठक घेत होते. १८ आमदारांनी माझी तक्रार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केली पण माझे नाव घेण्याच्या आगोदरच त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हाकालून दिले होते.
शिवा संघटना म्हणून एका जातीचे नाहीतर सर्व जाती धर्माच्या लोकांचे कामे करतोत.
मागच्या वर्षी ही राखी पौर्णिमेचा कार्यक्रम झाला व त्यांची ओवाळणी आता टाकली.
शिक्षणक्षेत्र हे उपेक्षित राहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची किती दूरदृष्टी होती. राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो त्यांना लक्ष्मण रेखा मांडून दिली होती की अर्थसंकल्पात ६ टक्के खर्च हा शिक्षणावर खर्च झाला पाहिजे पण महाराष्ट्रात केवळ दीड टक्का खर्च होतो. अशी यंत्रणा राबविली जात आहे की बहुजन लोकांनी शिक्षणच घेऊ नये. उच्च शिक्षणाला मोठ्या प्रमाणात पैसा लागत आहे त्यामुळे गोरगरीब हे शिक्षण घेऊ शकत नाहीत . १४० कोटी लोकांपैकी सरकार ८० कोटी लोकांना न मागता मोफत धान्य देत आहेत पण शिक्षण देत नाही.
शिक्षकांच्या व्यथा वेगळ्या आहेत.कंट्रात्री आहेत २००५ चे आहेत त्यांच्या वेगळ्या आहेत.
आपल्या समग्र शिक्षा अभियानची एसआर व फायन्ससकडे आपली यादी जाईल व तुमचा दुसरा जीआर निघेल व दुसरा जीआर निघाला की तुमच पकल समजा व १ जुलैपासुनचा तुमचा पगार एकदाच मिळेल.तुमचा दसरा दिवाळी नवरात्र गोड व्हावी
तसेच समग्र शिक्षा अभियानचे काम झाले की डाटा एन्ट्री आॅपरेटर पोषण आहार संघटनेचे काम हाती घेऊ . आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे पुढच्या वर्षी पर्यंत तुमची दिवाळी गोड करु असे प्रा.मनोहर धोंडे म्हणाले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group