स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठ परिसरातील सर्व शैक्षणिक संकुले, उपपरिसर लातूर व परभणी, हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेज आणि किनवट येथील कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास संशोधन केंद्र येथील उन्हाळी-२०२३ च्या पदवी परीक्षा १८ एप्रिल पासून सुरू होणार आहेत.तर पदव्युत्तर पदवी/व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या व इतर परीक्षा ३ मे पासून सुरू होणार आहेत.
याबाबतचे सविस्तर वेळापत्रक व परीक्षा केंद्रसूची विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले आहे. तसेच संबंधित महाविद्यालयास विद्यार्थ्यांच्या नेमलिस्ट व प्रवेशपत्र पाठविण्यात आलेले आहे. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी केले आहे.

COMMENTS