नांदेड:(दि.११ एप्रिल २०२३) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा...
नांदेड:(दि.११ एप्रिल २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र -कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दि.८ एप्रिल २०२३ रोजी संगणकशास्त्र विभागाच्या वतीने माहिती तंत्रज्ञान महोत्सव (आयटी फेस्टिवल) उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ.एम.एम.व्ही.बेग यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अमर सोनटक्के, बीसीएस तृतीय वर्ष, सचिन बुरुजपट्टे, बीसीएस द्वितीय वर्ष आणि सुमय्या फिरदोस अब्दुल, एम.एससी. संगणकशास्त्र, द्वितीय वर्ष या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्राप्त झाले तसेच सहा स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले.
विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ.एम.एम. व्ही.बेग आणि भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा.गौतम दुथडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.नितीन नाईक, संघटक सचिव डॉ.श्रीकांत जाधव, प्रा.पी. बी.पाठक,डॉ.काझी फरहीन, डॉ.संगीता भुसारे, डॉ.एस.एम.शिंदे, प्रा.जी.बी.चौसटे, कु.अमरीन खान, प्रसिद्धीप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, डॉ.वीरभद्र स्वामी, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात संगणकशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील १५४ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

COMMENTS