मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी अध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त, यशवंतराव चव्हाण यांचे खाजगी सचिव आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी मा. स्व. शरद काळे यांची शोकसभा प्रथम मुंबई एज्युकेशन इनिशियटीव्ह, एशियाटिक सोसायटी, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, ग्रंथाली प्रकाशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, मराठी विज्ञान परिषद मुंबई व फेसकॉम मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, (मंत्रालयासमोर) मुंबई येथे संपन्न झाली. सदर स्मृतीसभेमध्ये माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार,डॉ.अनिल काकोडकर, ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस.के. शेट्ये, डॉ. नरेंद्र जाधव, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे व शरद काळे यांचे संबंध चांगले होते. त्यांच्या काळात गोदी कामगारांचा एकही संप झाला नाही. त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी ऍसिटिक सोसायटी वाचनालयात लाखभर दुर्मिळ ग्रंथांचे जतन केले. ते अतिशय कुशल असे प्रशासक होते. शरद काळे मितभाषी,एक आजात शत्रू होते. मुंबई बंदरातील त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी वडाळा येथे मुंबई बंदराच्या कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या मुलांसाठी सहा माळ्याची भव्य शाळा बांधून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. असे सर्व मान्यवरांनी स्वर्गीय शरद काळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना सांगितले.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिध्दीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन.

COMMENTS