नांदेड :(दि. ३१ जुलै २०२६ शुक्रवार)
भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ श्रद्धेय कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांचे जीवन व कार्य अत्यंत प्रेरणादायी असून त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे नित्य आयोजन हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन उद्घाटक महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री व श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.श्री.डी.पी. सावंत यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात दि.२९ जुलै रोजी डॉ.शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी रक्तदान मंचावर सहसचिव डॉ.रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष अँड. उदयराव निंबाळकर, कार्यकारणी सदस्य श्री. नरेंद्र चव्हाण, माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात डॉ. रावसाहेब शेंदारकर यांनी, रक्तदान हे श्रेष्ठदान असून मानवी जीवनात रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट केले.
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथील डॉ. प्रांजल नरवाडे, डॉ.धनश्री केंद्रे व डॉ. भालेराव यांचे मार्गदर्शन व सहकार्याने शिबिर यशस्वी झाले. डॉ.संदीप राठोड, १८ विद्यार्थी आणि नऊ विद्यार्थिनी अशा २८ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
सूत्रसंचालन डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी तर आभार डॉ.रत्नमाला म्हस्के यांनी मानले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ. कैलास इंगोले, डॉ.बालाजी भोसले, प्रा.अभिनंदन इंगोले, लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कोमल कागदेवाड, वैष्णवी मंडेवाड, दिव्या थोंबाळे, निखिल सोनकांबळे, विश्वजीत परमार व सचिन तेलंग यांनी सहकार्य केले.

COMMENTS