पैठण:( दि. २३ ऑगस्ट २०२६)
भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठण येथील पुतळ्याला श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय वसंतराव गव्हाणे यांनी विनम्र अभिवादन केले. त्यांच्या समवेत श्रीनाथ कनिष्ठ महाविद्यालय, पैठण येथील प्रा. संतोष गव्हाणे यांची उपस्थिती होती.
संत ज्ञानेश्वर उद्यान हे केवळ मराठवाडा नव्हे; तर महाराष्ट्र आणि भारतातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. साधारणतः अंदाजे दररोज १००० पर्यटक, नागरिक या उद्यानाला भेट देतात तसेच कै. डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतात.
या पुतळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा पुतळा प्रथमतः जेव्हा नजरेस पडतो; तेव्हा श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण हे जिवंत आहेत आणि समाजहित आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी तत्पर आहेत; अशी आपोआप प्रचिती येते.

COMMENTS