. सेलू ( ) परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी नूतन विद्यालय सेलू येथे सकाळी 11 वा. जिल्हा क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
टेनिसहॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने 24 व्या राज्य सब ज्युनियर व ज्युनियर मुले- मुली टेनिस हॉलीबॉल स्पर्धा चिखली जि.बुलढाणा येथे दिनांक 23 ते 25 सप्टेंबर 2022 रोजी संपन्न होणार आहेत. सदरील आयोजित स्पर्धेत निवड समिती सदस्य म्हणून प्रा.नागेश कान्हेकर, गजानन शिंदे,शेख सिकंदर, शरद पवार,निलेश माळवे, सिध्दांत लिपने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी शाळेचे बोनाफाईड, आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो, क्रीडा गणवेशात सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे.तसेच सबज्युनियर गटासाठी जन्मतारीख 1/1/2007 व ज्युनियर गटासाठी(मुले/मुली)जन्मतारीख 1/1/2005 या तारखेचा किंवा या तारखे नंतरचा असावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव सतिश नावाडे (7588992945) संपर्क साधावा.
या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडुंनी उपस्थित रहावे असे आवाहन परभणी जिल्हा टेनिस हॉलीबॉल असोसिएशन अध्यक्ष मा.आ.हरीभाऊ लहाने, उपाध्यक्ष खा.संजय जाधव, विनोद बोराडे, राज्य सचिव गणेश माळवे, प्रा.नागेश कान्हेकर, किशोर देशमुख, सी.टी.नावाडे, डॉ.माधव शेजुळ ,जिल्हा सचिव सतिश नावाडे, संदिप लहाने नारायण शिंदे, सौ.संगिता खराबे.यांनी केले आहे.

COMMENTS