नांदेड. (विशेष प्रतिनिधी) परभणी येथील मूळरहिवासी तथा महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रसाद चोखोबा सूर्यवंशी (वय-८१ वर्षे) यांचे १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी हडको, नांदेड येथे निधन झाले. दिवंगत प्रसादराव सूर्यवंशी यांच्या पार्थिव देहावर १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परभणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक तथा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका डॉ. करूणाताई जमदाडे यांचे 'ते' वडील व साहित्यिक तथा गायक भीमराव जमदाडे- शिराढोणकर यांचे 'ते' सासरे होत.
डॉ. करूणा जमदाडे यांना पितृशोक
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा