*खुपसरवाडी ता. नांदेड-*
येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजारोहणानंतर मराठवाडा स्वातंत्र्यसंग्रामातील साक्षीदारांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा मातोश्री प्रतिष्ठानचे संचालक तथा मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुपसरवाडीच्या सरपंच आसमाबी महेमूद शेख हे होत्या तर प्रमुख उपस्थिती राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंडित पवळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महाजन भिमराव मंडले, तंटामुक्त समिती अध्यक्ष महेमूद शेख,पोलीस पाटील यादव मंदावाड,ग्रामपंचायत सदस्य सरस्वती आचमे,अन्साजी भोसले,उल्फतबी शेख हे होते. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, भाषणे व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कलागुणांचा अविष्कार केला. कलागुणातून उपस्थितांची मने जिंकल्यामुळे शिवश्री कामाजी पवार यांनी प्रोत्साहन म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी निधी दिला. शाळेतील उपक्रमाशील शिक्षक शिवानंद द्रोणाचार्य यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त "मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या" औचित्यावर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.खुपसरवाडी ग्रामपंचायत मार्फत या अमृत महोत्सवी वर्षाची भेट म्हणून शाळेला दोन व्हीलचेअर, 12 फायबर खुर्च्या, चार टेबल, एलईडी लाईट इत्यादी साहित्य शाळेला भेट दिले. त्यामुळे शाळेच्या वतीने शिवश्री कामाजी पवार यांच्या हस्ते सरपंच व सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक तंत्रस्नेही मुख्याध्यापिका कल्पना मुसांडे यांनी केले; तर महाराष्ट्र पुरोगामी प्रा. शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जे. डी. कदम यांनी आपल्या मनोगतातून शाळेत राबवत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रम, शालेय उपस्थिती, गुणवत्ता इत्यादी बाबीवर गावकऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उत्तम निवेदक, बहुआयामी शिक्षक रामचंद्र बस्वदे यांनी केले व श्रोत्यांची मने जिंकली.आभार बालाजी आचमे यांनी मानले.
सदरील कार्यक्रमास मातोश्री कॉलेजचे
प्रशासकीय अधिकारी प्रवीण किणीकर, प्रा. कपिल पिचेवार, शिवशंकर तूप्पेकर, गंगाधर पवार, शेख बुराहान, विठ्ठल गांगुर्डे,दत्तात्रय पांचाळ, के. एल. कदम, शाळेतील सर्व विध्यार्थी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

COMMENTS