मुदखेड (ता. प्र.) मौजे राजवाडी- राजवाडी तांड्याचा वळण रस्त्यावर वाहतूक आईसर पलटून भीषण अपघात सकाळी साडेआठ दरम्यान अपघात झाला, यात तीन व्यक...
मुदखेड (ता. प्र.)
मौजे राजवाडी- राजवाडी तांड्याचा वळण रस्त्यावर वाहतूक आईसर पलटून भीषण अपघात सकाळी साडेआठ दरम्यान अपघात झाला, यात तीन व्यक्ती जागीच ठार तर बाराजने गंभीर जखमी झाले. मुदखेड शहरात लगत असलेल्या बारड रोड वळणावर कार व मोटरसायकल अपघातात एक महिला ठार तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाले.
मुदखेड तालुक्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात झाले मुदखेड येथील MH 04 GF 2705 आईचर असून हे आईसर हिमायतनगर येथील आठवडी बाजारात राजवाडी मार्गाने जात असताना, राजवाडी येथे अरुंद रस्ता असल्याने त्या रस्त्याचा वाहनचालकास अंदाज न लागल्याने वाहनचालकाच्या वाहनावरचा ताबा गेल्याने अरुंद रस्त्यामुळे बाजूला असलेल्या खड्ड्यात आदळ उलटली त्यामध्ये आठवडी बाजाराचे माल व त्यात बाजार व्यापारी होते. या अपघातात तीन व्यापारी जागीच ठार झाले तर बारा व्यापारी गंभीर जखमी झाल्याने मुदखेड ग्रामीण रुग्णालयातून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घडलेल्या घटनाचे घटनास्थळीचे आईचर उचलन्यास गावकऱ्यांनी विरोध करीत आरुंद रस्त्या करणाऱ्या गुत्तेदरावर आधी गुन्हा नोंदवून त्यांला अटक करा व त्यानंतरच येथील आईचर उचला असे गावकऱ्यांकडून तट धरण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाने काही अवचित प्रकार घडू नये म्हणून किरकोळ लाठी चार करीत जमाव पळविण्यात आला. त्यानंतर खड्ड्यातील आईचर रस्त्यावर काढण्यात आले. या घटनेच्या अधिक तपास बारड येथील एपीआय सुभाष वानोळे करीत आहेत. यात मैतांचे नाव मोहम्मद रफीक अमीन साहब वय वर्ष 45, मोहम्मद चांदसाब मिरासाब वय वर्ष 60, मोहम्मद हाफिझ मोहम्मद हुसेन वय वर्षे 45 असे नाव आहेत. गंभीर जखमी झालेले मोहम्मद जाफर, सय्यद रियाज, मोहम्मद उस्मान, अब्दुल जलील, मोहम्मद मजीद, मोहम्मद रस्तिखार, मोहम्मद अराषद, मोहम्मद खुर्दस, मोहम्मद लतीफ, मोहम्मद हसीफ, मोहम्मद मिराज व मोहम्मद समीर हे गंभीर जखमी असल्याने यांना नांदेड येथील शासकीय दवाखान्यात हलवण्यात आले.
मुदखेड येथील बारड वळण रस्त्यावर एक कार वळण घेत असताना, भरधाव येणाऱ्या मोटरसायकल चालकानी सरळ कारला धडक दिल्याने त्यात एक महिला संगीता बुद्धाची कौठे वय वर्ष 42 वसरनी येथील रहिवासी असून ती जागीच ठार झाली व मोटार सायकल चालक संभाजी पुरभाजी गव्हाणे हे गंभीर जखमी झाल्याने नांदेड येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले.
.jpg)
COMMENTS