मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन व मुंबई पोर्ट प्राधिकरण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर २०२२ रोजी कॉटन ग्रीन येथील युनियनच्या अधिपत्याखालील चालक, मालक व तंत्रज्ञ कामगार विश्रांतीग्रहात मोफत आरोग्य तपासणी आणि कोव्हिड लसीकरण शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, यूनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे कामगार सदस्य दत्ता खेसे, यूनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, विजय रणदिवे, प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, युनियनचे उपाध्यक्ष मीर निसार युनूस, शीला भगत, शशिकांत बनसोडे, संघटक चिटणीस बाळकृष्ण लोहोटे, पुंडलिक तारी, विष्णू पोळ, योगिनी दुराफे, प्रविणा शिरोडकर, कविता भोसले, अशोक डफळ, नागनाथ घाडगे, बाबुराव जाधव, सरगर, देवराम भोर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिराला मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे वरिष्ठ उपसचिव रफिक कुरेशी, मुंबई महानगर पालिका फायर ब्रिगेडचे अधिकारी सुर्वे, मुंबई पोर्ट प्राधिकरण पे अँड पार्कचे कॉन्ट्रॅक्टर जयप्रकाश अगरवाल यांनी भेट दिली. दिवसभर जवळजवळ ६४ कामगार व कुटुंबियांनी या आरोग्य तपासणी व कोव्हीड लसीकरणाचा शिबिरातून लाभ घेतला. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले मुंबई पोर्ट प्राधिकरण रुग्णालयाचे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व सर्व कामगार कार्यकर्त्यांना युनियनतर्फे धन्यवाद.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन


COMMENTS