देवणी तालुक्यातील वडमुरंबी येथील पशुवैद्यकीय कार्यालयाच्या प्रांगणामध्ये 17 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत...
देवणी तालुक्यातील वडमुरंबी येथील पशुवैद्यकीय कार्यालयाच्या प्रांगणामध्ये 17 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वडमुरंबी मा.गांधी तंटामुक्ती अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार मुर्गे माधराव यांच्या हस्ते सकाळी 7:30 वाजता ध्वजवंदन करण्यात आले.या वेळी पत्रकार मुर्गे यांनी हैद्राबाद आणि मराठवाडा मुक्ती संग्राम यांचा इतिहास घटने बद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शनासह माहिती दिली.
यावेळी वडमुरंबीचे सरपंच ज्ञानोबा भिंगे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विनोद शिंदे,पशुधन अधिकारी डॉ.कराड,कर्मचारी बाळ किशोर बोईनवाड
परिचर राहुल कांबळे,सेवा दाता गुणवंत बिरादार आणि वडमुरंबी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

COMMENTS