प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरूंदा पोलिस ठाण्याचे हद्दीत कानोसा शिवारात काही व्यक्ती चंदनाची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती कुरूंदा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चंदनतस्करास बेड्या ठोकल्या. या बाबत अधिक माहिती अशी की, कानोसा शिवारातील शेतकरी नारायण बंडे यांच्या शेतातील ओढ्या लगत काही चंदन चोर चंदनाच्या झाडाची चोरी करत असल्याची माहिती कुरूंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांना मिळाल्यानंतर मोरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सापळा रचुन एका आरोपीस 30 किलो चंदनासह अटक केली असुन त्याच्या कडून चंदन ज्याची किंमत 2 लाख 10 हजार, एक मोटरसायकल 50 हजार व 2 मोबाईल 22 हजार असा एकुण 2 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी अजीज ईस्माईल कुरेशी, शिवाजी दळवी, राजु लोकेवार यांच्या विरूद्ध कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS