लातूर/ येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील (कॉक्सिट) राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरात ५३९ विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली.
कॉक्सिट हे संगणकाशी संबंधित महाविद्यालय आहे. येथील विद्यार्थ्यांना संगणकावर बसूनच अभ्यास करावा लागतो. यामुळे त्यांचे डोळे निरोगी असावेत, यासाठी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. एम. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्यदिनानिमित्त महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यात ५३९ विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यातील १०० विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागात बोलावण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे सिनेट सदस्य सूरज दामरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, नेत्र तपासणीसाठी आलेले डॉ. श्रेयश लोहिया, डॉ. सुजय खेडेकर, डॉ. अमर जाधव, महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. एच. महामुनी, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. कैलास जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश पवार उपस्थित होते. या शिबिरात महाविद्यालयातील ५३९ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

COMMENTS