नांदेड : आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे पालन करत सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावे, आपला आनंद व्यक्त करत असताना इतरांना त्रास होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी याशिवाय उन्हापासून स्वतःचा बचाव करत आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी केले .आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने आज नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीत त्या बोलत होत्या .
पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे , आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, पोलीस उपाधीक्षक मोरे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थित होती.
यावेळी पुढे बोलताना महापौर सौ. जयश्री निलेश पावडे म्हणाल्या कोरोणा महामारीच्या काळात दोन वर्षे आपण कोणतेही सण उत्सव साजरे करू शकलो नव्हतो. मात्र आता पुन्हा आपणास हा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. येणाऱ्या आगामी सणांमध्ये रामनवमी, हनुमान जयंती , महावीर जयंती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि रमजान ईद असे सर्व धर्मातील अत्यंत महत्त्वाचे सण उत्सव आहेत . त्यामुळे हे सर्व सण उत्सव साजरे करत असताना प्रत्येक नागरिकाने साविंधनिक नियमांचे पालन करावे. कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन करू नये. आपण आपले सर्व सण उत्सव साजरे करत असताना स्वतःची आपल्या कुटुंबीयांचीही उन्हापासून काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे .जिल्हा प्रशासन , पोलीस प्रशासन सर्व सण उत्सवाचे अनुषंगाने आपली प्रशासकीय तयारी करीत आहेत परंतु आपण एक जबाबदार नागरिक या नात्याने जबदरीचे पालन करून आपले सण-उत्सव साजरे करावेत असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनीही प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. प्रशासकीय यंत्रणा सर्व सण-उत्सव साजरे करण्याच्या अनुषंगाने खबरदारीच्या उपाययोजना करीत असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी .धार्मिक सलोखा आणि राष्ट्रीय एकता एकात्मता जपावी असे आवाहन त्यांनी केले. शांतता कमिटीच्या बैठकीत सुभाष रायबोले, दुश्यंत सोनाळे, उमेश चव्हाण तसेच नांदेड मधील सर्वधर्मीय नागरिक, प्रतिष्ठित व्यापारी वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

COMMENTS