नांदेड प्रतिनीधी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अन्वये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या ...
नांदेड प्रतिनीधी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अन्वये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या ५० तासांचे नवनियुक्त शिक्षक समावेशन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नवनियुक्त शिक्षकांना प्रमाणपत्राचे वाटप सोमवारी दुपारी करण्यात आले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवख्या शिक्षकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात २५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पवित्र पोर्टल व्दारे नियुक्त झालेल्या राज्यातील सर्व जिल्हा परिषद व शासनमान्य शिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांसाठी ऑक्सफर्ड दि ग्लोबल स्कूल येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड द्वारा प्रशिक्षणाचे आयोजन सहा गटात करण्यात आले होते. या प्रशिक्षणात एकूण ३२० नवनियुक्त शिक्षक सहभागी झाले होते. या प्रशिक्षणात शैक्षणिक वातावरण व कार्यपद्धती, अध्यापन पद्धती, मूल्यमापनाच्या नवीन पद्धतीची ओळख, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, सामाजिक व भावनिक अध्ययन, भविष्यवेधी शिक्षण, शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर शालेय स्पर्धा परीक्षा, निपुण भारत अभियान: ओळख, व्यवस्थापन, तान तणावाचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आदी विषयावर सात दिवस सुलभकांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण भविष्यात शिक्षकांना सेवा सातत्य ठेवण्यासाठी बंधनकारक होते. नांदेड जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी हे ५० तासांचे समावेशन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले त्यांना सोमवारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे डायटचे अधिव्याख्याते प्रकाश शिरसे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी प्रा.डॉ.विनोद चव्हाण, प्रा.आदित्य गोडबोले, प्रा. किरण बिचकुंदे, प्रा.शिवलिंग चोंडे, प्रा. जयंत जोशी, प्रा.आदिनाथ पायगण, प्रा.एल आर कोकाटे, प्रा. ए आर कदम, प्रा. नेहा बोरकर, रोहिणी माने, आकाश कांबळे, स्नेहा सूर्यवंशी, प्रदीप जाधव, यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

COMMENTS