नांदेड दि. : टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व नांदेड जिल्हा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 23 व्या राष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धेला दि. 2 एप्रिल रोजी स्वा.रा.ती.म. विद्यापीठात सुरुवात झाली.
स्पर्धेचे उद्घाटन आ.मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते झाले. या वेळी संत बाबा बलविंदर सिंगजी, टेनिसव्हॉलीबॉलचे संस्थापक डॉ. व्यंकटेश वांगवाड, महासंघ चे अध्यक्ष आनंद खरे, छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दूधारे ,राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार, राज्य सचिव गणेश माळवे, कोषाध्यक्ष : धर्मविरसिंग जडेजा, शशिकांत नायक, सोमराव, नागेश्वर राव, मुकेश बाथम, गोविंद चैक, किशोर चौधरी, डॉ.दीपक बच्चेवार , क्रीडा संचालक डॉ. विठ्ठल सिंह परिहार, जिल्हा क्रीडाअधिकारी राजेश्वर मारावार, सत्यजित चिखलीकर,जिल्हा अध्यक्ष सतीश भेंडेकर,राज्य सचिव रस्सीखेच जनार्दन गुपीले आदींची उपस्थिती होती.
स्पर्धे साठी आंध्रप्रदेश, तेलंगणा, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश ,यजमान महाराष्ट्रासह 16 संघ सहभागी झाले आहेत. दिवस रात्र झालेल्या क्रीडा प्रकारात यजमान महाराष्ट्र संघाने ज्युनियर मुलीच्या गटात आंन्ध्राप्रदेश चा 2-0 जिकुंन अंतिम फेरीत प्रवेश केला .मध्ये प्रदेश संघास 2-0 मात करून महाराष्ट्र -प्रथम, मध्ये प्रदेश - व्दितीय, तर आंन्ध्राप्रदेश - तिसऱ्या स्थान प्राप्त केले.
ज्युनिअर मुलाच्या गटात गुजरात: प्रथम, आंन्ध्राप्रदेश: व्दितीय, तेलंगणा: तिसऱ्या स्थान प्राप्त केला.
युथ मुलीच्या गटात अंतिम लढत महाराष्ट्र वि. पँडेचरी दरम्यान 2-1 चुरशीची लढत होऊन महाराष्ट्र : प्रथम, पँडेचरी : व्दितीय, तर गुजरात : तिसऱ्या स्थान प्राप्त केले.
युथ मुला चा अंतिम सामना गुजरात वि. महाराष्ट्र दरम्यान 2-9 होऊन महाराष्ट्र :प्रथम, गुजरात : व्दितीय तर पँडेचरी तिसऱ्या स्थान प्राप्त केले.
ज्युनिअर मिश्र दुहेरी गटात महाराष्ट्र, आंन्ध्राप्रदेश, तेलगंणा अनुक्रमे विजयी ठरले.
युथ मिश्र दुहेरी गटात आंन्धप्रदेश,पँडेचरी, दिल्ली अनुक्रमे विजयी ठरले.
बक्षीस वितरण सोहळा दि.4 एप्रिल रोजी जि.प. सदस्य श्रीनिवास मोरे, टेनिसव्हॉलीबॉलचे संस्थापक डॉ. व्यंकटेश वांगवाड, महासंघ चे अध्यक्ष आनंद खरे ,विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, राज्य सचिव गणेश माळवे, कोषाध्यक्ष : धर्मविरसिंग जडेजा, शशिकांत नायक, सोमराव, नागेश्वर राव, मुकेश बाथम, गोविंद चैक, किशोर चौधरी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिंले,
स्पर्धा यशस्वीते डॉ. राहुल वाघमारे, कसिम खान, ,डॉ. रमेश नांदेडकर, शिवाजी क्षिरसागर, सुनील दोसलवार, विनोद जमदाडे, सतीश सावळे, बाबु शिंगणवाड, दिगंबर शिंदे , विशाल गडंबे, राहुल चंदेल, संतोष कांबळे, केंद्रे, ग्यानोबा गिरडे, एकनाथ पाटील, राज्य व जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.
राष्ट्रीय पंच प्रमुख प्रफुल्लकुमार बन्सोड, अक्षय गामणे, किरण घोलप, स्मृती रजंण, गणेश पाटील, सैलिल शिवहरे,रविंद्र जाठ, प्रसंगी, अँलैक्स , लिपने सिध्दांर्थ, राहुल वाघमारे,यांनी पंच म्हणून काम पाहिले.


COMMENTS