नांदेड शिक्षक पदोन्नतीची प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात येत असल्यामुळे तसेच संघटना व शिक्षक यांच्या आक्षेपाचा कोणताही विचार न करता...
शिक्षक पदोन्नतीची प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात येत असल्यामुळे तसेच संघटना व शिक्षक यांच्या आक्षेपाचा कोणताही विचार न करता पदोन्नतीची प्रक्रीया राबविण्यात येत असल्याने संतत्प शिक्षक हे शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला..
१) पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीची यादी प्रकाशित करणे.
२) Minimum qualification TET/CTET असताना तोच अंतिम निकष समजून ग्राह्य धरणे सेवाज्येष्ठता तसेच व्यावसायिक आर्हता विचारात न घेता नियमबाह्य पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करणे..
३) NCTE Delhi,मा.न्यायालयीन मार्गदर्शक तत्वे ,आदेश डावलून व शासनाचे कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन नसतानाही पदोन्नतीची प्रक्रिया घाईघाईत राबविणे..
४) CTET-2026 परीक्षा नुकतीच पार पडलेली असून येत्या आठवडाभरात निकाल अपेक्षित असून त्यांचाही समावेश पदोन्नती प्रक्रीयेत करणेची मागणी करण्यात आली..
५) शिक्षक पदोन्नतीतीची प्रक्रिया मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार राबविण्यात यावी कोणत्याही सेवाज्येष्ठता शिक्षकावर अन्याय होऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे.

COMMENTS