भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगार द्विपक्षीय वेतन समितीची बोलणी ताबडतोब सुरू करावी, मुंबई बंदरातील कामगारांना व सेवानिवृत्त कामगारांना मागील वेतन कराराची उर्वरित थकबाकी त्वरित द्यावी, बोनस योजनेत त्वरित सुधारणा करावी, मेजर पोर्ट ऑथोरिटी ऍक्ट २०२१ मुळे बंदरावर व कामगारांवर होणारे दुष्परिणाम याची चर्चा करून मार्ग काढावा, बंदरांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये, पेन्शन फंडातील तूट भरून काढावी या व इतर मागण्यांसाठी अकरा बंदरातील गोदी कामगार ५ एप्रिल २०२२ रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाणार होते. संपाची जोरदार तयारीही केली होती. या दरम्यान आय.पी. ए. चे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी सद्य परिस्थितीत फेडरेशनच्या नेत्यांना संप मागे घेण्याची विनंती केली होती. त्यावर पाचही महासंघाच्या नेत्यांनी सर्वानुमते चेअरमनची विनंती मान्य केली. त्यानुसार इंडियन पोर्ट असोसिएशनने ताबडतोब लेखी पत्र पाठवून २७ एप्रिल २०२२ रोजी दिल्लीला पाचही फेडरेशनच्या नेत्यांना बोलणी करण्यासाठी पाचारण केले आहे. त्यामुळे ५ एप्रिल २०२२ रोजी होणारा एक दिवसाचा लाक्षणिक संप २९ एप्रिल २०२२ पर्यंत पुढे ढकलला आहे, असे फेडरेशनचे व युनियनचे प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव यांनी सांगितले. सद्य परिस्थितीत घेतलेला निर्णय हा कामगार हिताचा आहे. असे ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये यांनी ४ एप्रिल २०२२ रोजी माझगाव येथे कामगार सदनमध्ये झालेल्या कामगार कार्यकर्त्यांच्या सभेत मार्गदर्शन करतांना सांगितले. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी सुधाकर अपराज, विद्याधर राणे, विजय रणदिवे, शीला भगत, संदीप कदम, मनीष पाटील, संदीप चेरफळे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरशी पारेख आदी पदाधिकारी, कामगार कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई बंदरात होणाऱ्या संपात
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट शोअर फ्लोटीला असोसिएशन,
मुंबई पोर्ट ट्रस्ट एस. सी. एस. टी. वेलफेअर असोसिएशन,
मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिय लोकाधिकार समिती या संघटनांचे कामगार शंभर टक्के सहभागी होणार होते.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS