मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी दादर येथील शिवसेना भवन येथे सचिव अनिलजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व संपर्क प्रमुख आनंद जाधव आणि नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईतील वर्षा बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी सचिव अनील देसाई, खासदार हेमंत पाटील, संपर्क प्रमुख आनंद जाधव व नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मुखेड तालुकाप्रमुख पदी नागनाथ लोखंडे यांची निवड करण्यात आली.तर शहरप्रमुखपदी शंकर चिंतमवाड यांची निवड करण्यात आली.
नागनाथ लोखंडे हे गेल्या १३ वर्षापासून शिवसेना पक्षा सोबत एक निष्ठ राहून त्यांनी पक्ष वाढीसाठी निस्वार्थ पणे काम केले ते शिवसेनचे शाखा प्रमुख झाले. त्यानंतर ते आजून जोमाने काम करू लागले त्याच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना युवा सेना शहर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली.तेही त्यांनी व्यवस्थित सांबाळली त्यांनतर त्यांची शिवसेना शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली होती.
या काळात त्यानी मोठ्या जोमाने काम करून मुखेड कंधार विधानसभा मतदार संघातून दोन वेळेस शिवसेनेचा आमदार निवडून आण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांच्या वर विश्वास ठेऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी नागनाथ लोखंडे यांना शिवसेना तालुका प्रमुख पदाची मोठी जबाबदारी दिली. त्यांच्या या निवडीबद्द जिल्ह्यातील विविध स्तरातून शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.
COMMENTS