सोनपेठ दि.६(प्रतिनिधी)सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवणार असल्याचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या व खाते प्रमुखांच्या बैठकीत सांगितले .
सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्गावर दि.५ रोजी रास्तारोको आंदोलन केले होते . या आंदोलन प्रसंगी महसुल प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खाते प्रमुखांची बैठक लावण्याचे अश्वासन आंदोलन कर्त्यांना दिले होते . त्या नुसार दि.६ रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आंदोलक शेतकरी व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . या बैठकीत गट विकास अधिकारी सचिन खुडे,नायब तहसीलदार अनिल घनसावंत,उप विभागीय अभियंता संजय बंडे,महामार्ग अभियंता लोढा,कृषी अधिकारी सुहास कौलगे,विज वितरण कंपनीचे उप अभियंता बिरादार,बँकेचे अधिकारी दिपक नारसे यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या वेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपल्या समस्या या बैठकीत मांडल्या बहुतांश समस्या तात्काळ सोडवण्यात आल्या काही समस्या साठी अधिकाऱ्यांनी वेळेची मागणी केली . या वर तहसीलदार सारंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवुन शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली व सर्वांच्या सहकार्याने प्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करु असे सांगितले. यावेळी सुधीर बिंदु,रंगनाथ सोळंके, रमाकांत जहागीरदार,माऊली जोगदंड, सोमनाथ नागुरे,भाऊ मोरे,राजेभाऊ निळे,माधव जाधव प्रकाश बचाटे,देवीदास भुजबळ, रामेश्वर बचाटे ,हनुमान सावंत युवराज बचाटे,अरुण मुंडे,शिवराज जोगदंड यांच्या सह सोनपेठ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठक संपल्यानंतर शेतकरी संघटनेचे विश्वंभर गोरवे यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो :- शेतकरी व खाते प्रमुखांच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली
COMMENTS