परभणी ( ) धुळे येथे पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेमध्ये परभणी जिल्ह्यातील 14 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेकडून प्रतिनिधित्व करताना कु.ओवी महेश बाहेती हिने 11 वर्षा खालील मुलीच्या गटात सहावा क्रमांक पटकावला.
ओवी ही चेतनानंद टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्रात एन.आय.एस. प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते.ओवी बाहेती परभणी क्लबची क्रीडा सदस्य असून स्कॉटिश अकॅडमी शाळेची विद्यार्थिनी आहे.या वयोगटात राष्ट्रीय स्पर्धेत पाठवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या संघात तिची निवड होणार आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील इतरही अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यात आद्या बाहेती हिने चौदावे स्थान पटकावले. तसेच स्मित करेवार या खेळाडूने 52 खेळाडू मध्ये प्रवेश केला. तिसऱ्या फेरीमध्ये त्याने ठाण्याचा खेळाडू विरुद्ध चांगलीच झुंज दिली, परंतु पाचव्या सेटमध्ये त्याला
पराभव स्वीकारावा लागला.
या सर्व यशस्वी खेळाडूचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष समशेर भैय्या वरपुडकर, डॉ. माधव शेजुळ, डॉ. संतोष सावंत, गणेश माळवे, डी.पी.पंडीत, परभणी क्लब डॉ. विवेक नावंदर, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार , तथा वरिष्ठ खेळाडू निखिल झुटे, गौसखान पठाण,विक्रम हातेकर, नरसिंह पाटील, पवन कदम, सुरज भुजबळ, महेश कांकरिया, पियुष रामावत आदीनी अभिनंदन केले.
COMMENTS