सोनपेठ/प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील आनंदनगर तांडा येथील ३२वर्षीय शेतकऱ्याने ६ ऑक्टोबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,पाथरी तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे विजय हरीभाऊ पवार व आत्माराम हरीभाऊ पवार यांचे कुटुंब राहत असून शेतात पाईपलाईनसाठी खाजगी सावकाराचे साडेचार लाख रुपये व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कृषी शाखेचे एकोणपन्नास हजार रुपये काढून शेतात पाईपलाईन केली होती.मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आपले पैसे कसे फिटतील या विवंचनेतून विजय हरीभाऊ पवार याने विषारी औषध प्राशन केले होते.यात त्यांची उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान त्यांच्या पश्चात दोन भाऊ,एक मुलगा,पत्नी,आई आदी आहेत.दरम्यान पवार यांच्या आत्महतेबद्दल हळहळ व्यक्त केली जात असून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.
COMMENTS