मुंबई दि.६: समाजातील पीडित वर्गाला मग तो स्त्री पुरुष किंवा बालक अथवा कोणत्याही धर्माचा असला तरी त्याला समान मानवाधिकार मिळावयास हवा!
कोणतेही कुटुंब किवा व्यक्ती समान न्यायापासून वंचित रहाता कामा नये,या महत उद्देशाने काम करणाऱ्या "स्वमन सोशल ह्यूमन राईटस् कौन्सिल"संस्थेच्या वतीने काल नवी मुंबई येथे समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मधूकर देसाई होते.
या प्रसंगी मुंबई पोलीस खात्यात कर्तव्यदक्षतेने काम करणारे निवृत्त मुंबई पोलीस उपायुक्त दिलीप माधव जगताप आणि कामगार क्षेत्रात सेवावृत्तीने काम करणारे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार,महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष,किमान वेतन कमिटीचे सदस्य निवृत्ती देसाई यांचा स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यांत आला.
नव्यामुंबईतील संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या समारंभाला डॉक्टर संजय घोष दास्तीकर,ज्येष्ठ इंटक रेल्वे कामगारनेते राजेंद्र भटनागर, मनोज उपाध्याय,अर्पिता घोष, आणि संघाचे सहसेक्रेटरी मोहन पोळ आदी विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.त्यांचाही यथोचित स्मान्मान करण्यात आला.
निवृत्ती देसाई सत्काराला उत्तर देताना म्हणाले.मानवदयेची खरी शिकवण आपल्याला पौराणिक महाभारतातून शिकायला मिळते.राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी भारतीयांच्या मनामनामध्ये मानवाधिकार प्रेरीत केला असून,हा विचार पुढे नेणे काळाची गरज आहे ! अध्यक्ष मधुकर देसाई म्हणाले,मानव कल्याणाचे हे कार्य संस्था अव्याह तपणे पुढे नेईल.संस्थेचे संचालक सुब्रता कुमार नायक यांचेही त्यावेळी भाषण झाले.●●●
COMMENTS