नायगांव /प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार)
नायगांव शहरातील महात्मा फुले कॉलनीतील सत्यशोधक अण्णाभाऊ साठे चौक येथे समाज बांधवांनी एक ऑगस्ट रोजी ध्वजारोहन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे यांचा क्रांतीध्वज नायगांव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सात ऑगस्टच्या मध्यरात्री चुकीच्या पद्धतीने काढल्याप्रकरणी संतप्त झालेल्या समाजबांधवांनी नायगावातील मुख्य चौकात हायवे रस्त्यावर रास्तारोको करून डीवायएसपी धुमाळ यांना निवेदन दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे दरवर्षीच समाजबांधवांनी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या एक ऑगस्ट रोजी जयंतीचे औचित्य साधून आपल्या अस्मीतेला अभिवादन व ध्वजारोहन करतात. यंदाही दरवर्षीप्रमाणेच केले असता कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा आपल्याच मर्जीने नायगांव पोलीस ठाण्यातील काही पोलिस कर्मचारी यांनी सात ऑगस्टच्या मध्यरात्री चुकीच्या पद्धतीने क्रांतीध्वज काढून टाकला असता हे प्रकरण सदर चौकाच्या बाजूलाच असलेल्या रसना बारच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरातुन निदर्शनास आले असता संतप्त झालेल्या समाजबांधवांनी तात्काळ पोलीस निरीक्षक रमाकांत पडवळ यांना निवेदन देऊन नायगावातील मुख्य चौकात रास्ता रोको करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यां विरूद्ध योग्य ती कारवाई करून निलंबित करा अशा घोषणा देत समाज बांधवांनी आपला मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळविला. विभागीय पोलिस अधिकारी बिलोली सिद्धेश्वर धुमाळ यांनी समाज बांधवांच्या तक्रारी ऐकून येत्या तीन दिवसात संबंधितांना योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले असता, तेव्हा तीन दिवसात कारवाई नाही झाल्यास आपण तीव्र आंदोलन छेडू अशा प्रतिक्रिया समाज बांधवांनी देऊन तक्रारी निवेदन दिले. यावेळी प्रविण भालेराव,शरद भालेराव, रवींद्र भालेराव, दयानंद भालेराव,रा.ना.मेटकर,शंकर गायकवाड, कैलास भालेराव, के एल बोयावार, मिथुन भालेराव, गजानन भालेराव, केशव भालेराव, मुकुंद कुडके, खदिर बागवान, गंगाधर भालेराव, गंगाधर कोतेवार, बाबाराव इंगळे, राजकुमार सोनकांबळे, दिगंबर झुंजारे, कपिल डुमने, साईनाथ देवकांबळे, प्रल्हाद भालेराव, प्रकाश वाघमारे यासह असंख्य समाजबांधवांची यावेळी उपस्थिती होती.

COMMENTS