नांदेड.(विशेष प्रतिनिधी) देगलूर तालुक्यातील कु.शा.वाडी अर्थातच कुतुबशाहापुरवाडी येथील रहिवासी तथा शेतकरी संग्राम गंगाराम चंद्रे (वय-६० वर्षे...
नांदेड.(विशेष प्रतिनिधी) देगलूर तालुक्यातील कु.शा.वाडी अर्थातच कुतुबशाहापुरवाडी येथील रहिवासी तथा शेतकरी संग्राम गंगाराम चंद्रे (वय-६० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी उपचारादरम्यान, नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात निधन झाले. दिवंगत संग्राम चंद्रे यांच्या पार्थिव देहावर शनिवार ७ ऑगस्ट रोजी दुपारी कुतूबशहापुरवाडी (ता. देगलूर) येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच बहिणी, मेहुणे, दोन मुले, चार पुतने, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. देगलूर येथील सिंधू कॉलेजचे प्रा. मिलिंद राजूरकर व नांदेड येथील दै. 'लोकमत'चे प्रतिनिधी शिवाजी राजूरकर यांचे 'ते' मामा होत.

COMMENTS