नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
नायगांव (खै.) तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार गजानन चौधरी यांची सर्वानूमते बिनविरोध निवड करण्यात आली.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे,माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार,जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन चौधरी,
तालुकाध्यक्ष स.जाफर,माजी तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील भिलवंडे,मनोहर तेलंग,तालुका सरचिटणीस पंडित वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय पाटबंधारे विश्रामगृह, नायगांव बा.येथे नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या दि 7 ऑगस्ट 2021रोजी आयोजित बैठकीत हि निवड जाहीर करण्यात आली.
कोरोना महामारीत बळी पडलेल्या पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांना प्रारंभी या बैठकीत आदरांजली वाहण्यात आली.
या बैठकीत कोरोना महामारीच्या अनुषंगाने पत्रकारिता क्षेत्रावर होत असलेला परिणाम,कोरोना महामारीच्या कालावधीत बळी पडलेल्या पत्रकार बांधव व त्यांचे कुटूंबिय यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगातून सावरण्यासाठी देण्यात येणारे पाठबळ,गत दोन वर्षातील कामकाजाचा आढावा, संघटनबांधणी आदी विविध बाबींवर सांगोपांग चर्चा यावेळी करण्यात आली.
आपल्या कार्यकारिणीचा कालावधी संपलेला असून गत चार वर्षांपासून आम्ही यशस्वीपणे काम करित असलो तरिही नवीन लोकांना काम करण्याची संधी मिळावी यासाठी आम्हाला पदापासून मुक्त करुन नव्याने कार्यकारिणी गठीत करावी अशी विनंती या बैठकीत तालुकाध्यक्ष स.जाफर व तालुका सरचिटणीस पंडित वाघमारे यांनी केल्यानंतर या बैठकीचे अध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर व जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे यांनी आयत्यावेळी आलेल्या या विषयावर उपस्थित सर्वांशी चर्चा करुन कार्यरत कार्यकारिणीचा राजीनामा मंजूर करुन सदरील तालुका कार्यकारिणी बरखास्त केली व सूचनेनुसार नव्याने कार्यकारिणी निवडीसाठी सुचना मागविल्या त्यानंतर,पूर्वीपासूनच्या परंपरेनुसार मावळते तालुकाध्यक्षपद नरसी येथे असल्याने नायगांव (बा.) शहरातून नव्याने सदरचे पद देण्यात यावे असे सर्वानूमते ठरविण्यात आले.त्यानुषंगाने या पदासाठी दै.देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी गजानन चौधरी, दै.दलितकैवारीचे संपादक प्रकाशभाऊ हनमंते,दै.श्रमिक एकजूटचे तालुका प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार या तिघांनी स्वतःची ईच्छा प्रकट करुन तालुकाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली असली तरिही ऐनवेळी चर्चेतून चौधरी यांनाच पाठींबा जाहिर करुन अन्य दोघांनी माघार घेतल्यामूळे गजानन चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच,उर्वरित तालुका कार्यकारिणी पूढील बैठकीत जाहीर करण्यात यावे असे यावेळी ठरले.
मावळते तालुकाध्यक्ष स. जाफर,मावळते तालुका सरचिटणीस पंडित वाघमारे व कार्यकारिणीला निरोप देऊन नुतन तालुकाध्यक्ष गजानन चौधरी यांचे उपस्थितांनी जंगी स्वागत केले.
निवडीनंतर नायगांव (बा.) शहरात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतीषबाजी करुन पत्रकारांनी आनंद व्यक्त केला.
बैठकीचे सुरेख सुत्रसंचलन प्रकाशभाऊ हनमंते यांनी केले. शेवटी मावळते तालुकाध्यक्ष स.जाफर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या बैठकीला सुभाष पेरकेवार, कैलास तेलंग,रामप्रसाद चन्नावार. गोविंद नरसीकर, लक्ष्मण बरगे,दिलीप वाघमारे, रामराव पाटील ढगे,मारोती बारदेवाड,गंगाधर गंगासागरे, बालाजी हनमंते,अनिल कांबळे,देविदास जेठेवाड, शेषेराव कंधारे,शंकर अडकिणे, अशोक जाधव,केरबा रावते, किरण वाघमारे,भगवान शेवाळे, प्रशांत वाघमारे,चंद्रकांत सुर्यतळ,पवनकुमार पुठ्ठेवाड, साहेबराव धसाडे,शाम गायकवाड,स.आजिम,आनंद सुर्यवंशी आदींसह नायगांव तालुक्यातील सर्व पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS