सोनपेठ/प्रतिनिधी महाराष्ट्रात नुकताच काही दिवसांपूर्वी महापूर येऊन मोठ्या प्रमाणात भुस्खलन्न झाले आहे.यात तब्बल ३०० जणांना आपला जीव गमवावा ल...
सोनपेठ/प्रतिनिधी
महाराष्ट्रात नुकताच काही दिवसांपूर्वी महापूर येऊन मोठ्या प्रमाणात भुस्खलन्न झाले आहे.यात तब्बल ३०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.त्याचबरोबर परिसरातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त लोकांच्या कुटुंबियांसह मयताच्या कुटुंबियांना तत्काळ मदत करत त्यांचे पुनर्वसन करुन मयताच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीला लावण्याची मागणी सोनपेठ तालुका वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.निवेदनावर तालुकाध्यक्ष हनुमान पंडित,मार्गदर्शक मुंढे(गुरुजी),शहरध्यक्ष सुशिल सोनवणे,रामेश्वर पंडित,संदीप रणदीवे,वैभव खंदारे,सुनील प्रधान,ईश्वर मुजमले यांच्यासह आदी स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS